15
Mar 23
शैक्षणिक सत्र 2022-23 मधील महादीप सामान्यज्ञान परीक्षेत गुणवत्ता यादीत प्राविण्य प्राप्त जिल्हा परिषद शाळांमधील 56 विद्यार्थ्यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना वरिल उद् गार मंत्री महोदयांनी काढले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून हा उक्रम संपूर्ण महाराष्ट्रात जि. प. शाळामधून राबविण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला त्याचप्रमाणे,जिल्हास्तर अंतिम परीक्षेपर्यंत आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना यवतमाळ ते सेवाग्राम अशी हेलीकॉप्टर वारी करण्याची घोषणा ,मंत्रीमहोदयानी केली.
हा उपक्रम प्रत्यक्ष राबविणारे अधिकारी, कर्मचारी व शिक्षक हे सुद्धा कौतकास पात्र आहे.त्यांची ही दखल शासनस्तरावर घेण्यात येईल. असे प्रशंसोद्गार काढून मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे अभिनंदन केले.
यासमयी
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, त्रॅकसुट, व सायकल भेट देऊन जिल्हा परिषद सभागृहात गौरविण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, विनय ठमके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशांत थोरात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ज्योती भोंडे मुख्य वित्त व लेखा अधिकारी, प्रशांत गावंडे अधिव्याख्याता डाएट यवतमाळ उपस्थित होते.