• शिलादेवी बोरा पब्लीक स्कूलच्या विद्यार्थ्यांची विश्वविक्रम मधे नोंद अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  यवतमाळ लोहार येतील सौ शीला देवी बोरा पब्लीक स्कूल च्या चार विद्यार्थ्यांची पर्वतासन आसनात विश्वविक्रमी मध्ये नोंद झाली आहे. योग सर्वांच्या आरोग्यासाठी ऐक वरदानच म्हणावा लागेल. योगामुळे अनेक आजार दूर होतात. त्यामुळे आपल्या देशात योगाला खूप महत्त्व आहे. अखिल भारतीय योग महासंघ द्वारा जागतिक स्तरावर मास योगा वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. त्यात जागतिक स्थरावरून अनेकांनी व 8 राज्यातून 30 स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यात शीला देवी बोरा पब्लीक स्कूल चे वर्ग पचवितील विद्यार्थी त्रिशा चिरडे व धनश्री नालांवार 10 मिनिट, पर्वतासन आसनात एकाच स्थितीत स्थिर राहून आपल्या नावे विश्वविक्रम करून आपले नाव योगा वर्ल्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे नोंदवले व आपले व आपल्या शाळेचे, यवतमाळचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे.त्यांच्या या कामगिरी बदलसंचालक डॉ हर्षवर्धन बोरा, विभा बोरा, संजय कोचे व उषा कोचे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, क्रांती अलोने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना निलेश शेटे, श्वेता बंदूक, अर्चना कडू, वैशाली महाजन, मनीषा ताजने, हर्षा ढेरे, पल्लवी देशमुख, मनीषा खोपे, परमेश्वर उडाके, शारदा नेवारे, पुनम यांनी उत्तुंग भरारीच्या शुभेच्छा दिल्या


 • वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन संकेतस्थळ पुन्हा सुरु अनुसुचित जमातिच्या विद्यार्थ्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  अभियांत्रकी, वैद्यकिय व विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी २०२२- २३ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता वसतीगृह प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन भरण्याकरीता 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन संकेतस्थळ पुन्हा सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत वसतीगृहात रिक्त असलेल्या जागा अशा आहेत. मुलांचे वसतीगृह कळंब-36, राळेगाव -28 , वणी -59, झरी जामणी -55 , पांढरकवडा - 11 , घाटंजी -29 तसेच मुलींचे वसतीगृह कळंब- 38 ,वणी - 20 झरी जमाणी- 29 , घाटंजी - 7 याप्रमाणे जागा उपलब्ध आहेत. सन 2022-23 या वर्षाकरीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता शासकिय वसतीगृहात प्रवेशासाठी https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळ ऑनलाईन अर्ज सादर करावा असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी,तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प याशनी नागराजन यांनी केले आहे.


 • नव उद्योजकांसाठी 'मार्जिन मनी”योजना' अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  केंद्र शासनाच्या “स्टॅड अप इंडीया” योजनेंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द समाजच्या घटकांकरीता “मार्जिन मनी” योजना सुरू करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इच्छुक नव उद्योजक तरूणांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी 5 डिसेंबर अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण रामसिंग चव्हाण यांनी केले आहे. या योजनेसाठी 18 वर्षावरील नव उद्योजक पात्र आहेत. उद्योग सुरू करण्यासाठी स्टँड अप इंडीया योजने अंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर झाल्यानंतर उर्वरीत फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नव उद्योजकांना प्रकल्प मुल्यांच्या 15 टक्के अनूदान राज्य शासनामार्फत मार्जिन मनी म्हणुन देण्यात येते. तसेच 10 टक्के स्वहिस्सा उमेदवाराला भरावा लागतो. सदर “मार्जिन मनी” योजना समाज कल्याण विभागमार्फत राबविण्यात येत आहे. शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर शासन निर्णय निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त,समाज कल्याण, पळसवाडी कॅम्प,दारव्हा रोड यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा.


 • जाणून घेऊ या भारताचे संविधान अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  भारत हा जगातील सर्वात बलवान लोकशाही असलेला देश आहे. आपल्या देशाचा राज्यकारभार ज्या नियम, कायद्यानुसार चालतो ते म्हणजे आपले *संविधान, भारताची राज्यघटना*. सर्वसमावेशक व सर्वन्यायी राज्यघटनेमुळेच भारताची जगात वेगळी ओळख आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती व संविधान समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, मसुदा समितिचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितिच्या सदस्यांनी रात्रंदिवस एक करुन आपल्याला हे संविधान दिले आहे. प्रत्येक नागरिकाच्या घरात हे संविधान असायलाच हवे. कारण आपला सगळा जीवनप्रवास संविधानाने दाखविलेल्या मार्गानेच पूर्ण होणार आहे. २६ नोव्हेंबर या संविधान दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या संविधानाविषयी जाणून घेऊ या. खरे तर संविधानाच्या उद्देशिकेमध्येच संविधानाचा संपूर्ण सार आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारित आपले संविधान आहे. राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अंमलात आली. भारतीय संविधानात २२ भाग (प्रकरण), १२ अनुसूचि व दोन परिशिष्ट आहेत. दोन परिशिष्ट ही जम्मू काश्मीरसाठी आहेत. संविधानाची सुरुवात उद्देशिकेने होते. उद्देशिकेतील "हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करित आहोत" या ओळीतच संविधानाचे मूल्य अधोरेखित केले आहे. भारतातील लोकांनी स्वत:ला हे संविधान अर्पण केले आहे हा उदात्त विचार यात आहे. संविधानाच्या भाग एक मध्ये संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र याबाबत माहिती दिली आहे. भाग दोन मध्ये नागरिकत्वाची सविस्तर व्याख्या नमूद करण्यात आली आहे. मूलभूत हक्कांबाबतचा उल्लेख भाग तीन मध्ये आहे. यात समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, विवक्षित कायद्याची व्याप्ती व संविधानिक उपाय योजण्याचा हक्क या बाबत विवेचन दिले आहे. राज्य धोरणांची निदेशक तत्वे यावर भाग चार मध्ये सविस्तर माहिती आहे. भाग पाच हा अतिशय महत्त्वाचा आहे. यात राष्ट्रपती व उपराष्ट्रपती- मंत्रीपरिषद, संसद, संसदेचे अधिकारी, कामकाज चालविणे, सदस्यांची अपात्रता, संसद व तिचे सदस्य यांचे अधिकार, वैधानिक कार्यपद्धती, वित्तीय कार्यपद्धती, सर्वसाधारण कार्यपद्धती, राष्टपतींचे वैधानिक अधिकार, संघ न्याय यंत्रणा व भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक याविषयी माहिती दिली आहे. भाग सहा हा राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कार्यकारी यंत्रणा याबाबत यात नमूद करण्यात आले आहे. राज्यपाल, मंत्रीपरिषद, राज्याचा महाधिवक्ता, सरकारी कामकाज चालविणे, राज्य विधानमंडळ, राज्य विधिमंडळाचे सदस्य, सदस्यांची अपात्रता, वित्तीय बाबींमधील कार्यपद्धती, सर्वसाधारण कार्यपद्धती, राज्यपालांचे अधिकार, राज्यांमधील उच्च न्यायालये, दुय्यम न्यायालये यांच्या विषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. भाग सात मध्ये पहिल्या अनुसूचीच्या भाग ख मधील राज्य आहेत. संघ राज्यक्षेत्राबाबत भाग आठ मध्ये तर पंचायती, नगरपालिका, सहकारी संस्था यांच्या विषयीचे नियम भाग नऊ मध्ये देण्यात आले आहेत. अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्रे याबाबत संविधानाच्या भाग दहा मध्ये उल्लेख आहे. भाग अकरा मध्ये संघराज्य आणि राज्य यामधील संबंध, वैधानिक अधिकाराची विभागणी, प्रशासनिक संबंध, पाण्यासंबंधी तंटे, राज्या- राज्यांमधील समन्वय याविषयी माहिती देण्यात आली आहे. वित्तसंस्था, मालमत्ता व दावे, संघराज्य आणि राज्ये यांच्यामध्ये महसुलांचे वाटप, संकीर्ण वित्तीय तरतुदी, भारत सरकारने व राज्यांनी कर्जे काढणे व मालमत्तेचा हक्क याबाबत भाग बारा मध्ये नमुद आहे. संविधानाचा भाग तेरा हा भारताच्या राज्य क्षेत्रातील व्यापार, वाणिज्य व व्यापार संबंधाने आहे. भाग चौदा मध्ये संघराज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेवा विषयी माहिती देण्यात आली आहे. या प्रामुख्याने लोकसेवा आयोग व न्यायाधिकरणे, यांचा समावेश आहे. देशात व राज्यात होणाऱ्या निवडणुकांबाबत भाग पंधरा मध्ये माहिती आहे. विवक्षित वर्गांसंबंधी विशेष तरतुदी संविधानाच्या भाग सोळा मध्ये दिल्या आहेत. राजभाषा व संघराज्याची भाषा याबाबतचे विवेचन भाग सतरा मध्ये आहे. भाग अठरा हा आणीबाणीसंबंधी तरतुदीचा आहे. भाग एकोणीस हा संकीर्ण आहे. संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्या संबंधीची कार्यपद्धती ही बाब भाग वीस मध्ये नमूद करण्यात आली आहे. भाग एकवीस अस्थायी, संक्रमणकालीन व विशेष तरतुदीचा आहे. भाग बावीस हा संक्षिप्त नाव, प्रारंभ, प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने यासाठीचा आहे. अशा प्रकारे संविधान बावीस भागात् विभगले गेले आहे. संविधानात बारा अनुसुच्या सुद्धा समाविष्ट आहेत. संसदेच्या शिफारशीनुसार संविधानात कालपरत्वे सुधारणा व दुरुस्त्या सुद्धा करण्यात आल्या आहेत. आपले संविधान हे जगात श्रेष्ठ मानले जाते ते फक्त न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता या घटकामुळे. आपल्या देशाची ही राज्यघटना भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने मराठीत भाषेत उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक नागरिकाने संविधानाची एक प्रत आपल्या संग्रही ठेवायलाच हवी. कारण आपला सगळा जीवनप्रवास संविधानाने दाखविलेल्या मार्गानेच पूर्ण होणार आहे.


 • चाईल्ड लाईन” से दोस्ती सप्ताहाचे उद्घाटन अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालय, व चाईल्ड लाईन इंडिया फाउंडेशन मुंबई अंतर्गत संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ द्वारा चाईल्ड लाईन 1098 से दोस्ती सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. चाईल्ड लाईन 1098 ही राष्ट्रीय पातळीवरील टोल.फ्री. क्रमांकाची मदत सेवा आहे. याद्वारे 18 वर्षा आतील आपत्कालीन स्थितीतील बालकांना आवश्यक ती संरक्षणात्मक सेवा पुरविण्यात येते. कोणतीही व्यक्ती 1098 या टोल फ्री.क्रमांक वर संपर्क करून अडचणीत सापडलेल्या बालकाला आवश्यक ती मदत पुरवू शकतो. याशिवाय वैद्यकीय सहाय्याची आवश्यकता असलेल्या बालकांना मदत पुरविणे मानसिक,शारीरिक व लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या बालकांना संरक्षण उपलब्ध करून देणे, सापडलेल्या किंवा हरविलेल्या बालकाला त्यांच्या कुटुंबात पुर्नस्थापित करणे, अनाथ व निराधार अथवा निवा-याची आवश्यकता असलेल्या बालकांना निवारा उपलब्ध करून देणे, अल्पवयात होणाऱ्या बालविवाहांना थांबवून बालविवाह प्रथा निर्मूलन करणे बालकामगारांना मुक्त करणे व पुनर्वसनात्मक सेवा पुरविणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत बालकांना आवश्यक ती संरक्षणात्मक सेवा जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पुरविण्यात येते. 14 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय बालक दिन व 20 नोव्हेंबर रोजी जागतिक बालक दिनाचे औचित्य साधून “चाईल्डलाईन से दोस्ती” सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी चाईल्ड लाईन से दोस्ती,स्वाक्षरी रथ व दोस्ती बंधन अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे केले. याप्रसंगी मुख्य कर्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उप जिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे ,उप मुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत भोयर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, बालकल्याण समिती अध्यक्ष वासुदेव डायरे, बालकल्याण समिती सदस्य प्राची निलावार, तसेच कामगार अधिकारी प्र.रा. महाले, बालन्याय मंडळ सदस्य ॲड.काजल कावरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, चाइल्ड लाईन 1098 चे जिल्हा केंद्र समन्वयक फाल्गुन पालकर, शासकीय बालगृहाचे शिक्षक व बालके तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईन 1098 चे कर्मचारी उपस्थित होते.


 • गायरान जमिनीवरील अतिक्रमण या वर्षा अखेरीस काढून टाकण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  यवतमाळ जिल्ह्यात गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात निवासी, वाणिज्य, औद्योगिक आणि शेती या प्रयोजनासाठी नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या एका सुमोटो याचिकेवरिल निर्णयानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ६ महिन्यावरिल अस्तित्वात असलेली सर्व प्रकारची अतिक्रमणे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 53( 2 )नुसार पंचायतीला असा कोणताही अडथळा किंवा अतिक्रमण काढून टाकण्याचा तसेच खाजगी मालमत्ता नसलेल्या कोणत्याही गायरानवर किंवा इतर जमिनीवर अनधिकृतपणे लागवड केलेले कोणतेही पीक काढून टाकण्याचा अधिकार आहे. खाजगी मालमत्ता नसलेल्या कोणत्याही खुल्या जागेतील मग ती जागा पंचायतीमध्ये समाविष्ट असो किंवा नसो त्या जागेवरील कोणतेही अनधिकृत अतिक्रमण काढून टाकण्याचा तसाच अधिकार आहे मात्र अशी जागा सरकारकडे निहीत असल्यास जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याची परवानगी प्रथम मिळवून घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीने असा अडथळा अतिक्रमण केले आहे त्या व्यक्तीने तो काढून टाकण्याचा खर्च दिला पाहिजे, किंवा त्या व्यक्तीकडुन तो खर्च वसूल करावा असेही जिल्हाधिकारी यांनी एका उद्घोषणेद्वारे कळविले आहे. सदर अतिक्रमण ज्या व्यक्तीने केले आहे त्या व्यक्तीने किंवा शासकीय यंत्रणेने काढून टाकावीत असेही सांगितले आहे.


 • पुराभिलेख विभागातर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रदर्शन नावीन्यपूर्ण कल्पना

  संचालक पुराभिलेख


  पुराभिलेख विभाग, कोल्हापूर व पुरातत्व विभाग, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन कार्यावर आधारित दुर्मिळ छायाचित्रे व कागदपत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी हे प्रदर्शन दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ ते २५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये भरविण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाटन उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भगवान कांबळे यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खरात हे होते. या प्रदर्शनाद्वारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार व कार्य सर्वांसमोर पोहोचविण्याचा पुराभिलेख विभागाचा मानस होता. सदरील प्रदर्शनास लोकांचा उदंड प्रतिसाद लाभला.


 • शीलादेवी बोरा पब्लिक स्कूल मधे बालक दिन साजरा अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  यवतमाळ स्थानिक लोहार येतील सौ शीलादेवी बोरा पब्लिक स्कूलमध्ये बालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यामुळे शिलादेवी पब्लिक स्कुल येथे बालक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला . कार्यक्रमच्या सुरवातीला पंडित जवाहरलाल नेहरू व सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून दीप प्रज्वलन करण्या आले मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका श्वेता बंदूके व इन्चार्ज अर्चना कडू यांनी केले या निमित्ताने वयक्तिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले सदर स्पर्धेत नर्सरी व kg1 वर्गातून अनवी डोमे, त्रिशिका उके, यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांक अंशुल धूत, डिंपल मटाले यांनी मिळवला Kg2 मधून पहिला क्रमांक आरुषी तिवारी द्वितीय क्रमांक रुद्र राठोड तृतीय क्रमांक धनश्री फूसे, वर्ग पहिलीमधून स्नेहल ठाकरे द्वितीय कादंबरी फूसे तृतीय पार्थ चिरडे यांनी तर वर्ग दुसरा आणि तिसरा मधून पहिला क्रमांक समीक्षा धवांजेवर द्वितीय क्रमांक स्वरा दरोनडे तृतीय क्रमांक आरोही कुमरे वर्ग चवथी आणि पाचवा मधून प्रथम क्रमांक रिद्धीमा कुमरे व्दितीय क्रमांक उडाके व धनश्री नालांवार तृतीय क्रमांक त्रिशा चिरडे यांनी पटकवला उपस्थित मान्यवरांनि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ उषा कोचे ह्या लाभल्या होत्या. यावेळी सौ मनीषा ठाकरे, सौ मेघा बुटले, सौ योगिता येडके, यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन पल्लवी देशमुख यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनीषा ताजने, मनीषा खोपे, हर्षा डेरे, क्रांती अलोने, शारदा नेवारे, पूनम यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 • संविधान दिनी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना जिल्ह्यात सर्वत्र उद्देशिकेचे होणार वाचन अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास,श्रध्दा व उपासना यांचे स्वांतत्र्य, दर्जाची व संधीची समानता प्राप्त करुन देणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर, 1949 रोजी देशाला अर्पण करण्यात आले. आपल्या संविधानाबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टिने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयामध्ये भारताचे संविधान या विषयावर प्रश्नमंजुषा, बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा व विविध स्पर्धांचे आयोजन व उद्देशिकेचे वाचन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. संविधानाचा स्वीकार करुन 71 वर्ष पूर्ण झाली आहेत. जगभरातील संविधान बारकाईने वाचल्यानंतर, त्यांचा अभ्यास केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितिने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला होता. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी तो भारतीय संविधान सभेसमोर मांडला. 26 जानेवारीपासुन या संविधानानुसार प्रजसत्ताक पद्धती आपण लागू केली. 19 नोव्हेंबर 2015 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबरला 'संविधान दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासुन देशात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय, खाजगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना भारतीय संविधान, संविधानाने सर्वांना दिलेले अधिकार व त्यासोबत आपली कर्तव्ये ई. माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी 26 नोव्हेंबरला जिल्हयातील सर्व शाळा (जिल्हा परिषद, नगर परिषद, सर्व आश्रमशाळा, खाजगी सर्व माध्यमाच्या शाळा), सर्व महाविद्यालयांमध्ये शाळेच्या पहिल्या तासामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) सर्व विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन घेण्यात यावे. तसेच सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांच्या हस्ताक्षरात भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे लेखन करुन घेण्यात यावे. शिक्षकांनी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाबाबत माहिती दयावी अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी एका आदेशाद्वारे दिल्या आहेत. शासकीय कार्यालयांना 26 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी असल्याने 25नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता उद्देशिकेचे वाचन करावे. तसेच सर्व माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये भारताचे संविधान या विषयावर प्रश्नमंजुषा, बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा ई. उपक्रमही घेण्यात यावे. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचीमाहिती व ओळख सोबत अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम घेण्यात सुचना श्री येडगे यांनी दिल्यात. सदर उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करणा-या कार्यालये, शाळा व महाविद्यालयांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.


 • शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी विमा काढण्याचे आवाहन अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2022-23 रब्बी व उन्हाळी हंगामाकरीता लागू करण्यात आली असुन शेतकऱ्यांनी बागायती गहू व हरभरा पिकासाठी विमा भरण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२२ व उन्हाळी भुईमूग पिकासाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2023 पर्यंत आहे. जास्तित जास्त शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी विमा काढण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करावा. यासाठी शासनाने भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई क्षत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रिट, फोर्ट, मुंबई 400023. टोल फ्री क्रमांक 1800 419 5004 या कंपनीची निवड केलेली आहे. अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी पीक कर्ज घेतल्यास शेतकऱ्यांना देखील या योजनेत सहभाग घेणे बंधनरककारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजननेत भाग घेण्याच्या अंतिम मुदतिच्या किमान सात दिवस पूर्व संबंधित बँकेस पिक विमा न भरणे बाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला 7/12 उतारा, बँक पासबुक आधार कार्ड व पीक पेरणीची स्वयंघोषणापत्र घेऊन अधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा हप्ता भरलेली पोहोच पावती शेतकऱ्यांनी जपून ठेवावी. कॉमन सर्विस सेंटर, (CSC) आपले सरकारचे मदतीने शेतकरी विमा योजनेत सहभाग घेऊ शकतात. तसेच www.pmfby.gv.in पोर्टलवर देखील माहिती तसेच अर्ज करणे सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे .


 • महारेशिम अभियान 2023 रेशिम शेतीसाठी शेतक-यांनी अनुदानाचा लाभ घ्यावा अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येते. जिल्ह्यात महारेशीम अभियान 2023 अंतर्गत तुती, टसर क्षेत्र नोंदणी कार्यक्रम 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शेतक-यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लाभार्थी निवडीचे निकष अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती (Nomadic Tribes), भटक्याविमुक्त जमाती (Denotified Tribes), दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे, महिलाप्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे. भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिराआवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्यनिवास (वन अधिकारी मान्यता) अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती, कृषी माफी योजना सन 2008 नुसार अल्पभूधारक (एक हेक्टर पेक्षा जास्त दोन हेक्टरपर्यंत) व सीमांत शेतकरी (एक हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र) क्षेत्र मर्यादा प्रति लाभार्थी एक एकर राहिल. या योजनेअंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी तीन वर्षांमध्ये अकुशल व कुशल (सामूग्री) मजुरी देण्यात येते. त्याचा तपशिल असा आहे. तुती लागवड व जोपासना - 2 लाख 36 हजार 322 रुपये, कीटक संगोपन गृह - 1 लाख 3 हजार 578 रुपये, फलक 3 हजार रुपये असे एकूण 3 लाख 42 हजार 900 रुपये अनुदान दिले जाते. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)अंतर्गत तुती रोपवाटिका, तुती लागवड, कीटक संगोपन गृह व संगोपन साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले जाते. लाभार्थी निवडीचे निकष इच्छुक लाभार्थीकडे मध्यम ते भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. लागवड केलेल्या तुती क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. रेशीम उद्योगासाठी कुटुंबांमध्ये किमान एक व्यक्ती तूती लागवड व संगोपनासाठी उपलब्ध असावी. अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती / महिला / दिव्यांग व इतर शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे. *नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थसहाय्य तपशील* तुती रोपे तयार करण्यासाठी प्रती एकर सर्वसाधारण (७५ टक्के) १लाख १२ हजार ५०० अनु जाती, जमाती(९० टक्के) १ लाख ३५ हजार रुपये, तुती लागवड विकास कार्यक्रमाकरिता सहाय्य प्रती एकर सर्वसाधारण (७५ टक्के) ३७ हजार ५००, अनुसूचित जाती /जमाती(९० टक्के) ४५ हजार रुपये, दर्जेदार कोष उत्पादनासाठी- कीटक संगोपन साहित्य / शेती अवजारे साहित्य पुरवठासहाय्य आधुनिक माउंटेज (Rotary Mountages) सहित, प्रति लाभार्थी, सर्वसाधारण (७५ टक्के) ५६ हजार २५०, अनुसूचित जाती /जमाती (९०टक्के) ६७ हजार ५००, कीटक संगोपन गृह बांधणीसाठी सहाय्य प्रति लाभार्थी १ हजार चौ फुटासाठी सर्वसाधारण (७५ टक्के) १ लाख २६ हजार ४७९ अनुसूचित जाती /जमाती (९०टक्के) १ लाख ५१ हजार ७७५ रुपये. मॉडेल २ (६००चौ. फूट), सर्वसाधारण (७५ टक्के) ७१ हजार ३९७, अनुसूचितजाती / जमाती (९० टक्के) ८५ हजार ६७७ रुपये आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेशीमशेती उद्योग वाढीसाठी वाव असून या योजने चालाभ घेण्यासाठी बारमाही सिंचनाची सोय व आधी खर्च करण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, प्रशासकीय इमारत पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, परिसर येथे अर्ज करावा असे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी व्ही. एस. शिंदे, यांनी केले आहे.


 • बोरा पब्लिक स्कूल मधे अनोखा उपक्रम! नावीन्यपूर्ण कल्पना

  जिल्हा परिषद यवतमाळ


  यवतमाळ स्वछता हे किती महत्वाचे आहे सर्वानाच माहिती आहे संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचा संदेश दिला,त्यांच्या विचारांना घेऊन भारताचे पंतप्रधान यांनी देशात स्वच्छता अभियान सुरू केले व कोरोना काळात स्वच्छता खूप महत्त्वाची आहे सर्वानाच माहिती या सर्व गोष्टींचा विचार करून लोहार येथील सौ शिलादेवी बोरा पब्लिक स्कूल मधे कर दान उपक्रम राबविण्यात आला आज आपण सर्वजण २१व्या शतकातील मशीनच्या युगात जगत आहे. फक्त बटण दाबले की, चुटकीसरशी अनेक कामे होत आहेत. संगणक युगामुळे बौद्धिक कामाला फारच महत्त्व दिले जात आहे; परंतु बौद्धिक कामाबरोबरच शारीरिक श्रमसुद्धा महत्त्वाचे आहेत. अंग मेहनतीच्या कष्टाच्या श्रमाला थोडं कमी समजलं जातंय हे मानवाचा विकास व आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. मानवाच्या प्राथमिक व अत्यावश्यक गरजा आहेत, त्या श्रमातूनच भागवल्या जात आहेत आणि म्हणूनच कोणतेही काम कमी महत्त्वाचे नसते. गौतम बुद्ध यांना आळस हा माणसाचा शत्रू आहे असे वाटत होते. महात्मा गांधी, विनोबा भावे व साने गुरुजी यांसारख्या मानवतेच्या सेवकांना कोणतेही काम हलकं नाही, कमी महत्त्वाचे नाही हे त्यांनी स्वत: कष्टाची कामं करून सर्व जनतेला श्रम संस्काराचा आदर्श घालून दिला. संत गाडगेबाबा तर दिवसभर ग्रामसफाई करत व रात्री कीर्तनाद्वारे माणसांची मनं साफ करण्याचा प्रयत्न करत असत. श्रम करूया..एक होऊया..आपला गाव घडवूया.. स्वच्छतेमध्येच देव हाय हा विचार त्यांनी पटवून दिला. आपल्या रोजच्या जीवनात कष्टाला व श्रमाला फार महत्त्व आहे. म्हणूनच श्रमाचे महत्त्व ओळखून शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये श्रम संस्कार व्हावेत, कष्टाची जाणीव व्हावी व श्रम प्रतिष्ठा वाढावी म्हणून सौ शिलादेवी बोरा पब्लिक स्कूल मधे कर दान उपक्रम राबविण्यात येत असतो. या निमित्ताने शाळेतील मुलांकडून शाळेच्या परिसर स्वच्छ करून घेण्यात आला व स्वच्छतेचा संदेश देण्यात आला या उपक्रमात मुलांना स्वतःचे काम स्वतः कशे करावे याचे पण शिक्षा देण्यात आली हा उपक्रम शाळेत अविरत राबवल्या जात आहे व मुलांवर संस्कार होईल अशे विविध उपक्रम शाळेत सुरू असतात या उपक्रमाला संजय कोचे व उषा कोचे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्वेता बंदूक, अर्चना कडू , वैशाली महाजन, मनीषा ताजने पल्लवी देशमुख, हर्षा डेरे, क्रांती अलोने, शारदा नेवारे, पुनम व सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली .


 • महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.... बहुमजली इमारती बांधणेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम स्वातंत्रोत्तर फलनिष्पत्ती

  जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर


  महा आवास अभियान 2020-21 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेस केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना यांच्या एकत्रित संख्यात्मक प्रगतीनुसार बहुमजली इमारती बांधणे यामध्ये राज्यात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार घोषित झाला आहे. हा पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे स्विकारणार आहेत, अशी माहिती प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी दिली आहे. महा आवास अभियान मध्ये उल्लेखनीय काम केलेबद्दल राज्य स्तरावर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यासाठी गगनबावडा तालुक्यास द्वितीय क्रमाकांचा पुरस्कार घोषित झाला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनमध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यासाठी कागल तालुका तृतीय याप्रमाणे पुरस्कार घोषित झालेली आहेत. विशेष पुरस्कारामध्ये ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मध्ये अमित विचारे, पंचायत समिती पन्हाळा यांना पुरस्कार घोषित झालेला आहे. केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणीमध्ये गतिमानता आणि गुणवत्ता आणण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त राज्यात "अमृत महाअवास अभियान 2022-23" राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत, गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइट, मुंबई येथे होणार आहे.


 • शाहू महाराजांची छायाचित्रे व दुर्मिळ कागदपत्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन नवे संकल्प

  जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर


  जागतिक वारसा सप्ताहा निमित्त कोल्हापूर वस्तुसंग्रहालय व पुरालेखागार यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित छायाचित्रे व दुर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शन दि.23 ते 25 नोव्हेंबर 2022 दरम्यान शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनायांतर्गत कोल्हापूर वस्तुसंग्रहालय व कोल्हापूर पुरालेखागार यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा, कोल्हापूर येथे होणार आहे. विनामूल्य असणाऱ्या या प्रदर्शनाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दत्तक विधानासंबंधीची कागदपत्रे, त्यांच्या राज्यारोहण समारंभाची कागदपत्रे, राजर्षी शाहू महाराजांनी प्रशासन गतिमान होण्यासाठी घेतलेले निर्णय व पारित केलेले कायदे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या सुधारणा, दीनदुबळ्यांच्या उद्धारासाठी केलेले कार्य, कला, क्रीडा, कृषी, उद्योग क्षेत्रामधील शाहू महाराजांचे कार्य, दुष्काळ व प्लेग काळातील त्यांचे कार्य, महत्वाचा पत्रव्यवहार असे राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.


 • जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर, नाबार्ड व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यावतीने मधपाळ शेतकरी अभ्यास दौरा व प्रशिक्षण उद्घाटन नावीन्यपूर्ण कल्पना

  जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर


  * मधमाशी मित्र प्रशिक्षण कार्यशाळेचा कोल्हापुरात शुभारंभ * देशातील अभिनव उपक्रम मध आणि रेशीम उद्योगामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर बनवण्यासाठी तसेच या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत बँकांद्वारे कमी दरात वित्त पुरवठा होण्यासाठी नाबार्डच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा विश्वास नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक आशुतोष जाधव यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय, नाबार्ड व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मधपाळ शेतकरी अभ्यास दौरा व प्रशिक्षण’ कार्यशाळेचे उद्घाटन अंबिका नगर येथील ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस सेंटर येथे आज करण्यात आले. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, मध संचालनालयाचे (महाबळेश्वर) संचालक दिग्विजय पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी दत्तात्रय कुरुंदवाडे, केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण अनुसंधानचे राजेंद्र आटपाडीकर व महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी आदी उपस्थित होते. श्री. जाधव म्हणाले, मध आणि रेशीम उद्योगातून अधिकाधिक शेतकरी स्वावलंबी व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षणाची गरज आहे. मधपाल शेतकरी प्रशिक्षणाप्रमाणेच अन्य तांत्रिक प्रशिक्षण सत्र नियमित आयोजित होण्यासाठी नाबार्ड प्रयत्न करेल. मध संचालनालयाचे संचालक श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मधमाशा पालन उद्योगात अग्रेसर आहे. देशातील पहिले मधाचे गाव सातारा जिल्ह्यातील मांगर असून दुसरे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव होण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. राज्यात साधारण 5 लाख मधपेट्यांची आवश्यकता आहे, पण त्या तुलनेत केवळ हजारोंच्या संख्येनेच मधपेट्या तयार होत आहेत. ही गरज भागवण्यासाठी मधमाशा पालन उद्योगाला चालना देणे गरजेचे आहे. मधुमित्र संकल्पनेची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून होत आहे. अळीम रोगामुळे व अन्य कारणांनी मधमाशांचा मृत्यू होवू नये, यासाठी उपाययोजना करणे, मधमाशा पालन उद्योगासमोरील छोट्या छोट्या समस्या दूर करण्यात मधुमित्रांची भूमिका महत्वपूर्ण आहे. मधमाशांची वसाहत नष्ट न करता पोळ्यातून मध काढण्याच्या पद्धतीबद्दलही या प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे, असे सांगून श्री पाटील म्हणाले, राज्यात मधमाशा पालन उद्योगासाठी राज्य शासनाच्या वतीने अर्थसहाय्य केले जाते. मधुकेंद्र योजनेचा लाभ घेवून अधिकाधिक नागरिकांनी मधमाशा पालन उद्योग निर्मिती करावी. संदेश जोशी म्हणाले, खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि नाबार्डच्या सहकार्याने मधमाशी मित्र हा देशातील पहिला उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात होत आहे. या कार्यशाळेतून अधिकाधिक मधुमित्र तयार व्हावेत. जेणेकरुन शास्त्रोक्त पद्धतीने मधाचे पोळे काढण्यासाठी मधमित्रांचे जाळे तयार होईल. बऱ्याच ठिकाणी पेस्ट कंट्रोलद्वारे पोळे हटवले जाते, पण यामुळे मधमाशा नष्ट होतात. या कार्यशाळेत शास्त्रोक्त पद्धतीने पोळे काढण्याच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनामुळे सर्पमित्रच्या धर्तीवर मधमाशी मित्रांचे जाळे जिल्ह्यात तयार होईल. प्रशिक्षणार्थींच्या वतीने मोहन कदम म्हणाले, मधमाशांचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. मधमाशा जगविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या संकल्पनेतून आग्या मधमाशांचं जतन व संवर्धन, मधाचं गाव, मधुमित्र या संकल्पना राबवण्यात येत आहेत. मध आणि मेण प्रक्रिया केंद्र जिल्ह्यात सुरु होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. श्री आटपाडीकर यांनी मनोगतातून मधमाशा पालनाबाबत माहिती दिली. श्री. कुरुंदवाडे यांनी आभार मानले. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत मंगळवारी पन्हाळा येथे प्रात्यक्षिकासाठी अभ्यास दौरा तर बुधवारी चर्चासत्र व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते होणार आहे.


 • जात पडतळणी शिबीराचे आयोजन २४ नोव्हेंबरला अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  मंडणगड पॅटर्नची अंमलबजावणी बाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी,समिती यवतमाळ यांच्या मार्फत यवतमाळ तालुक्यातील सर्व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात 24 नोव्हेंबर 2022 रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी,(व्हॅलेडीटी सर्टिफिकेट) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सन 2022-23 मधील प्रवेशित 11 व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांकरिता जात प्रमाणपत्र पडताळणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,पळसवाडी कॅम्प, दक्षता भवन पाठीमागे दारव्हा रोड,यवतमाळ येथे 11 ते 5 या वेळेत करण्यात येईल. सदर कार्यशाळेत 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला परिपूर्ण अर्ज https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरून त्याचे प्रिंट आऊट काढून कार्यशाळेत सादर करावे. सदर कार्यशाळेतील प्राप्त प्रस्ताव त्वरित निकाली काढून जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप सामाजिक न्याय दिनी 26 नोव्हेंबर रोजी समारंभ पूर्वक करण्यात येईल. सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे समितीचे अध्यक्ष डॉक्टर माधव कुसेकर व उपायुक्त दिलीप राठोड यांनी केले आहे.


 • मुंग, उडीद, सोयाबीन खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेड मार्फत मुग ,उडीद, सोयाबीन खरेदीकरिता शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मार्फत ७ खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी केले आहे. ही ७ केंद्रे अशी आहेत. महागांव तालुका खरेदी विक्री समिती, महागांव, पांढरकवडा तालुका खरेदी विक्री समिती, पांढरकवडा, झरीजामणी - बळीराजा फळे- फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद- किसान मार्केट यार्ड शेलु (बु) पुसद, आर्णी- शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, दिग्रस- खरेदी विक्री समिती, दिग्रस, बाभुळगाव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती बाभुळगांव.यवतमाळ जिल्हयातील मुंग, उडीद व सोयाबीन खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी ४ नोव्हेंबर २०२२ ते शासनाकडुन अंतिम मुदतीचा आदेश प्राप्त होईपर्यंत करण्यात येत आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता शेतक-यांनी आवश्यक कागदपत्रे (आधारकर्ड, ७/१२ उतारा, पिक पेरा व बँकेचे पासबुकची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत ) संबंधित खरेदी केंद्रावर देवून मुंग, उडीद ,सोयाबीन खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्रीमती अर्चना माळवे यांनी केली आहे.


 • कोळसा खाणी क्षेत्रात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्या पालकमंत्री संजय राठोड अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  वणी, माजरी क्षेत्रांतर्गत एकोणा, माजरी, निलजाई पैनगंगा, मुंगोली या कोळसा खाणीतून कोळसा वाहतूकची कामे स्थानिक लोकांना देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी वेस्टर्न कोल्ड फिल्डच्या अधिका-यांना केल्यात. कोळसा खाणीमध्ये स्थानिक लोकांना रोजगार देण्यासंदर्भात व तेथील स्थानिक वाहतूकदारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे बैठक पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे खनिकर्म अधिकारी शिरीष नाईक, वणीचे उपविभागीय अधिकारी, वेकोलिचे महव्यवस्थापक संजयकुमार, आभाश चंद्रासिंग, आलोक ललितकुमार, ए के सिंग, ओ पी दुबे, अनिल हेपट, बिनेज कुमार, रोहित रमेश तसेच कामगार अधिकारी प्र.रा. महाले, राहुल बालमवार,रविश सिंह आणि वेस्टर्न कोल्ड फीलचे अधिकारी उपस्थित होते. वनी व मांजरी क्षेत्रांतर्गत असलेल्या कोळसा खाणींमधून कोळशाची वाहतूक करण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात ट्रक विकत घेतले आहेत. परंतु कोळसा वाहतुकीचे काम मोठ्या कंत्राटदारांना दिल्यामुळे स्थानिक गाडी मालकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. अशा तक्रारी प्राप्त झाल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. यावेळी स्थानिकांना अडचणीत आणून जिल्हा बाहेरील लोकांना रोजगार देऊ नये. तसेच स्थानिकांना काम न देता इतर लोकांना रोजगार दिल्यास कंपन्यांच्या विरोधात स्थानिक लोक रस्त्यावर उतरतील आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कंपन्यांना काम करणे कठीण होईल. यामुळे केंद्र आणि राज्य शासनाचेही मोठे नुकसान होईल याची जाणिव ठेऊन कंपन्यांनी स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा अशा सुचना श्री राठोड यांनी केल्यात. तसेच कोळसा खाणीमध्ये किती कामगार आहेत त्यांचे आधार कार्डसह यादी सादर करावी. कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. कामगारांचे वैद्यकीय तपासणी केली असल्यास त्याचा पुरावा, कामगारांची पोलीस पडताळणी तसेच पगार पत्रकाची माहिती सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्यात. यासाठी एक चमू नेमुन या सर्व बाबींची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. कोल वॉशरीजमध्ये कोळसा स्वच्छ करण्याची व्यवस्था असते मात्र अनेक कोल वॉशरीजमध्ये कोळशाचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोल वॉशरिज मध्ये कोणत्या नियमानुसार कोळशाचा साठा ठेवता येतो याची तपासणी महसूल, खनिज आणि कामगार विभागाचे अधिकाऱ्यांनी करावी. त्याचा अहवाल सादर करावा. अनधिकृत साठा केला असल्यास त्याला सील करावे असे आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलेत. कोळशाची वाहतूक करताना मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील धूळ उडून शेतकऱ्यांच्या पिकांवर जमा होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असुन कोळसा वाहतुक होणा-या रस्त्यावर नियमित पाणी शिंपडावे अशा सूचना आहे त्यांनी दिल्यात. यासोबतच जिल्ह्यातील शाळा डिजिटल करण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा केंद्र आणि कौशल्य विकास केंद्र उभारणीसाठी सीएसआर निधीतुन प्रस्ताव सादर करावे अशा सूचनाही पालकमंत्री यांनी दिल्यात.


 • कलावंतांनी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत कला व साहीत्य क्षेत्रातील मान्यवर कलावंताकरीता वृध्द साहित्यक व कलावंत मानधन योजना राबविण्यात येते. त्यामध्ये निवड झालेल्या कलावंताना तहह्यात दरमहा मानधन संचालक,सांस्कृतिक कार्य संचलनालय,मुंबई यांचे स्तरावरून ऑनलाईन पध्दतीने कलावंताचे बॅंक खात्यात जमा करण्यात येते. सदर मानधन सुरळीत सुरू राहण्याकरीता मानधनधारक कलावंतानी नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांचा हयातीचा दाखला सादर करावा असे आवाहन करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वृध्द साहित्यीक व कलावंत मानधन योजनेअंतर्गत पात्र मानधनधारक कलावंतानी त्यांचा नोव्हेंबर 2022 मधील हयात असल्याचा दाखला,बँक खात्याची झेरॉक्स प्रत व आधारकार्डची झेरॉक्सप्रत,संपर्क क्रमांक ई माहिती संबधीत पंचायत समिती कार्यालयात जमा करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


 • जात पडतळणी शिबीराचे आयोजन २४ नोव्हेंबरला अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  मंडणगड पॅटर्नची अंमलबजावणी बाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी,समिती यवतमाळ यांच्या मार्फत यवतमाळ तालुक्यातील सर्व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात 24 नोव्हेंबर 2022 रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी,(व्हॅलेडीटी सर्टिफिकेट) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सन 2022-23 मधील प्रवेशित 11 व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांकरिता जात प्रमाणपत्र पडताळणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,पळसवाडी कॅम्प, दक्षता भवन पाठीमागे दारव्हा रोड,यवतमाळ येथे 11 ते 5 या वेळेत करण्यात येईल. सदर कार्यशाळेत 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला परिपूर्ण अर्ज https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरून त्याचे प्रिंट आऊट काढून कार्यशाळेत सादर करावे. सदर कार्यशाळेतील प्राप्त प्रस्ताव त्वरित निकाली काढून जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप सामाजिक न्याय दिनी 26 नोव्हेंबर रोजी समारंभ पूर्वक करण्यात येईल. सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे समितीचे अध्यक्ष डॉक्टर माधव कुसेकर व उपायुक्त दिलीप राठोड यांनी केले आहे.


 • मतदारांनी मतदार यादीतील नावाची खात्री करुन घ्यावी -जिल्हाधिकारी यांचे आवा अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  एकीकृत प्रारूप मतदार यादी 9 नोव्हेंबरला प्रसिद्ध झाली असुन मतदार यादिवर 8 डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहे. तसेच मतदार नोंदणीसाठी 4 विशेष शिबिरे 19 आणि 20 नोव्हेंबर, 3 आणि 4 डिसेंबर रोजी होणार आहे. मतदारांनी आपले नाव मतदार यादित आहे का याची खात्री करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. तृतीयपंथी,देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे 26 व 27 नोव्हेंबरला होणार आहे. दावे आणि हरकती 26 डिसेंबर पर्यंत निकालात काढण्यात येतील. अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी 5 जानेवारी, 2023 ला करण्यात येईल. सन 2023 च्या जानेवारी, एप्रील,जुलै, ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्याच्या आधी 18 वर्ष पुर्ण करणारी व्यक्ती विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अर्ज क्र.6 भरुन आगाऊ मतदार नोंदणी करु शकतात. ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी https://nvsp.in, https://voterportal.eci.gov.in या संकेतस्थळावर करता येईल. किंवा Voter Helpline हे मोबाइल ॲप दाऊनलोड करुन करता येईल. प्रत्यक्ष मतदार नोंदणीसाठी आपल्या जवळच्या मतदार नोंदणी केंद्राला भेट द्यावी. मतदार मदत क्रमांकावर


 • मतदारांनी मतदार यादीतील नावाची खात्री करुन घ्यावी -जिल्हाधिकारी यांचे आवाहन अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  एकीकृत प्रारूप मतदार यादी 9 नोव्हेंबरला प्रसिद्ध झाली असुन मतदार यादिवर 8 डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहे. तसेच मतदार नोंदणीसाठी 4 विशेष शिबिरे 19 आणि 20 नोव्हेंबर, 3 आणि 4 डिसेंबर रोजी होणार आहे. मतदारांनी आपले नाव मतदार यादित आहे का याची खात्री करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. तृतीयपंथी,देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे 26 व 27 नोव्हेंबरला होणार आहे. दावे आणि हरकती 26 डिसेंबर पर्यंत निकालात काढण्यात येतील. अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी 5 जानेवारी, 2023 ला करण्यात येईल. सन 2023 च्या जानेवारी, एप्रील,जुलै, ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्याच्या आधी 18 वर्ष पुर्ण करणारी व्यक्ती विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अर्ज क्र.6 भरुन आगाऊ मतदार नोंदणी करु शकतात. ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी https://nvsp.in, https://voterportal.eci.gov.in या संकेतस्थळावर करता येईल. किंवा Voter Helpline हे मोबाइल ॲप दाऊनलोड करुन करता येईल. प्रत्यक्ष मतदार नोंदणीसाठी आपल्या जवळच्या मतदार नोंदणी केंद्राला भेट द्यावी. मतदार मदत क्रमांकावर


 • 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नवे संकल्प

  सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग


  'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


 • प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन संपन्न अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  रसायन व खत मंत्रालय भारत सरकार व कृषक भारती को. ऑप. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचा उद्घाटन सोहळा व कृषि मेळावा दि. 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता वैभव ऍग्रो एजन्सी दत्त चौक येथे लोकप्रिय आ. मदन येरावार यांच्या शुभहस्ते जिल्हा कृषि अधीक्षक एन. एम. कोडपकर, कृषि विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, डीजीएम कृभको मुंबई व्ही. एम. मोहरीर, क्षेत्र व्यवस्थापक, कृभको नागपूर बी. एस. चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलतांना लोकप्रिय आ. मदन येरावार म्हणाले की, रक्ताचे पाणी करुन जगातील समस्त जनतेचे पोट भरण्याचे काम शेतकरी बांधव करित आहे. उंच इमारती, मोठ मोठे विमानतळ, अडाणी, अंबानी, फोर्बच्या यादीत असले तरी जो पर्यंत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक दृष्ट्या समाज घडत नाही तो पर्यंत भारत विकसित झाला असे म्हणता येणार नाही असे आ. मदन येरावार यांनी प्रभावीपणे उपस्थित शेतकर्‍यांना पटवून सांगितले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, कृषि केंद्राचा मालक हा शेतकर्‍यांचा डॉक्टर आहे, तो सांगतो तसेच शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतो, ग्लोबल वार्मिंग, संपूर्ण जागत आहे. त्याचा उपाय जग शोधत आहे. देशातील शेतकरी धन धान्याने समृद्ध झाला असून 25 देशाला आपला भारत देश अन्न धान्य पुरवित आहे ही अभिमानाची बाब आहे. जो पर्यंत शेतकरी समृद्ध होत नाही तो पर्यंत भारत विकसित व विश्‍व गुरु होणार नाही असे ही ते म्हणाले. या प्रसंगी कोळमकर साहेब, माळोदे साहेब, शिवा जाधव, बर्डे साहेब, प्रछीप ओमनवार, फाळके साहेब, राजगुरु साहेब, महाबीजचे ठाकरे साहेब, गांवडे साहेब, अभय राऊत, दिलीप बोगावार, पंकज चिंतावार, ब्ल्यु डायमंड ट्रान्सपोर्टचे आमीन सेठ केराणी आदि प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन एरिया मॅनेजर कृभको नागपूर चे चव्हाण यांनी तर प्रास्ताविक नीरज रांहाडाफे तर आभार प्रदशन मोहित साहेब यांनी केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, कृषि मित्र, व्यापारी बांधव उपस्थित होते.


 • शीलादेवी बोरा पब्लिक स्कूल मधे बालक दिन साजरा अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  यवतमाळ स्थानिक लोहार येतील सौ शीलादेवी बोरा पब्लिक स्कूलमध्ये बालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यामुळे शिलादेवी पब्लिक स्कुल येथे बालक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला . कार्यक्रमच्या सुरवातीला पंडित जवाहरलाल नेहरू व सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून दीप प्रज्वलन करण्या आले मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका श्वेता बंदूके व इन्चार्ज अर्चना कडू यांनी केले या निमित्ताने वयक्तिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले सदर स्पर्धेत नर्सरी व kg1 वर्गातून अनवी डोमे, त्रिशिका उके, यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांक अंशुल धूत, डिंपल मटाले यांनी मिळवला Kg2 मधून पहिला क्रमांक आरुषी तिवारी द्वितीय क्रमांक रुद्र राठोड तृतीय क्रमांक धनश्री फूसे, वर्ग पहिलीमधून स्नेहल ठाकरे द्वितीय कादंबरी फूसे तृतीय पार्थ चिरडे यांनी तर वर्ग दुसरा आणि तिसरा मधून पहिला क्रमांक समीक्षा धवांजेवर द्वितीय क्रमांक स्वरा दरोनडे तृतीय क्रमांक आरोही कुमरे वर्ग चवथी आणि पाचवा मधून प्रथम क्रमांक रिद्धीमा कुमरे व्दितीय क्रमांक उडाके व धनश्री नालांवार तृतीय क्रमांक त्रिशा चिरडे यांनी पटकवला उपस्थित मान्यवरांनि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ उषा कोचे ह्या लाभल्या होत्या. यावेळी सौ मनीषा ठाकरे, सौ मेघा बुटले, सौ योगिता येडके, यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन पल्लवी देशमुख यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनीषा ताजने, मनीषा खोपे, हर्षा डेरे, क्रांती अलोने, शारदा नेवारे, पूनम यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 • अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा दौरा अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री संजय राठोड हे 17 नोव्हेंबर 2022 रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता यवतमाळ येथून शासकीय वाहनाने नेर - नबाबपुर कडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता नेर – नबाबपुर नगर परिषद यांचे वतिने आयोजित विविध विकास कामाचे भुमीपुजन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिदिनानिमीत्य प्रतिमेचे व शिल्पाचे पुजन व अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता श्री क्षेत्र चिंतामणी खोंडयाबारड, शिरसगांव (पांढरी) ता. नेर कडे प्रयाण. नेर तालुक्यतील सर्व कार्यालयीन विभाग प्रमुख यांचेसोबत गाव विकास व गावपातळीवरील विविध प्रश्नासंदर्भात बैठक घेतील. सायंकाळी 6.30 वाजता शासकीय विश्रामगृह नेर कडे प्रयाण. सायंकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह नेर येथे आगमन व तेथील उपस्थित पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व अभ्यागतांच्या भेटी. सोईनुसार निवासस्थान यवतमाळ कडे प्रयाण.


 • बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती सप्ताहाचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते उद्घाटन* 20 नोव्हेंबरपर्यंत करणार जनजागृती अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  बालकामगार या अनिष्ट प्रथेतून राज्याला मुक्त करण्याचा निर्धार शासनाने केलेला असुन कामगार विभागाद्वारे 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते महसुल भवन येथे करण्यात आले. कोणत्याही आस्थापना धारकांनी आपल्या आस्थापनेमध्ये बालकामगार ठेवू नये, सर्व आस्थापना धारकांची व देशातील प्रत्येक नागरीकांची सामाजिक जबाबदारी असून आपला जिल्हा,आपले राज्य व आपला देश बालकामगार मुक्त करण्याकरिता आपली सामाजिक बांधीलकी जोपासावी. तसेच यानंतर सुध्दा कोणत्याहीआस्थापनेमध्ये बाल कामगार आढळून आल्यास त्या आस्थापना धारकावर नियमानुसार कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही आस्थापना धारकांनी बाल कामगार ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले . यावेळी सरकारी कामगार अधिकारी प्र.रा.महाले ज्योती कडू जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, देवेन्द्र राजूरकरजिल्हा बाल संरक्षण अधिकारी, र.श.जतकर दुकाने निरीक्षक, विजय गुल्हाने , दाभाडकर चाईल्ड लाईन, व ईतर विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच बालगृहातील बालके सुध्दा उपस्थित होती. जिल्हाधिकारी यांनी 14 वर्षाखालील कोणत्याही बालकास कामावर ठेवण्यास या कायद्यान्वये प्रतिबंध करण्यांत आलेला आहे. तसेच 14 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन बालक यांना धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्यांस प्रतिबंध आहे असे सांगितले. सप्ताहा दरम्यान बालकांच्या चित्रकलास्पर्धा, निबंध स्पर्धा, आस्थापनामध्ये बालकामगार काम करीत नाहीत असे भित्तिपत्रके दर्शनी भागात लावणे तसेच चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या बैठकिचे आयोजन, शाळेच्या विद्यार्थ्यांची शहराच्या मुख्य बाजारपेठेमधुन रॅली, स्वाक्षरी मोहीम इत्यादी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यांत आलेले आहे. यादरम्यान बाल कामगार धाडसत्राचे आयोजन करुन बालकामगारांची मुक्तता करण्यांत येईल. आपल्या देशामधून बालकामगार या अनिष्टप्रथेचे समूळ उच्चाटन व्हावे ही प्रथा कायमस्वरुपी नष्ट व्हावी या उद्देशाने या कायद्याची निर्मिती करण्यांत आली. सदर कायद्याची प्रभाविपणे अंमलबजावणी करुन राज्य बालकामगार मुक्त व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये बालकामगार कृतीदलाची स्थापना केलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये बालकामगार कृतीदल कार्यरत असून सदर कृतीदलामध्ये विविध विभागाचे अधिकारी यांची समिती शासनाव्दारे स्थापन करण्यात आलेली आहे अशी माहिती प्र. रा. महाले यांनी दिली.


 • 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानांतर्गत पाटोदा तालुक्यात आरोग्य पथक दाखल नवे संकल्प

  सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग


  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानांतर्गत पाटोदा तालुक्यात आरोग्य पथक दाखल. १८ वर्षांवरील मुली, महिलांची केली तपासणी.


 • शासनाच्या विविध योजनांतून महिलांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करणार; आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा निर्णय नवे संकल्प

  सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग


  शासनाच्या विविध योजनांतून महिलांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करणार; आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा निर्णय


 • महापालिका क्षेत्रात सुमारे २ लाखांहून अधिक महिलांच्या आरोग्य तपासणी पूर्ण नवे संकल्प

  सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग


  'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' मोहिमेंतर्गत महापालिका क्षेत्रात सुमारे २ लाखांहून अधिक महिलांच्या आरोग्य तपासणी पूर्ण; ...तर १२ टक्के महिलांना मधुमेह, रक्तदाब


 • गरोदर मातांसाठी आरोग्य यंत्रणेचा पुढाकार, प्रत्येक मातेला व्हॉइस कॉल सेवा पुरवणार... या सेवेचे नाव असणार 'एम-मित्रा नवे संकल्प

  सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग


  आरोग्य यंत्रणेकडून राबविण्यात येत असलेल्या योजना, उपक्रम प्रत्येक गरोदर मातेपर्यंत पोहोचले जावेत, यासाठी आता उस्मानाबाद तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल व्हॉइस कॉल सेवा सुरू करण्यात येत आहे. या सेवेला 'एम-मित्रा' हे नाव देण्यात आले आहे.


 • यवतमाळ जिल्ह्यातील कोष्टी समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  कोष्टी समाज बहुउद्देशीय संस्था वडगाव रोड यवतमाळ च्या वतीने गोष्टी समाजामधील यवतमाळ जिल्ह्यातून उत्कृष्ट गुण मिळून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा दरवर्षीच घेण्यात येतो. परंतु मध्यंतरी कोरोना महामारी आल्यामुळे गेल्या दोन वर्षा त हा सोहळा शासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशातुन घेण्यात आल नाही. परंतु यावर्षी मात्र नुकताच ज्येष्ठ नागरिक भवन बालाजी सोसायटी महादेव नगर यवतमाळ येथे सन 2020 सन 2021 आणि सन 2022 या वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी, इयत्ता बारावी, तसेच पदवीधर विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा तसेच कोरोना योद्धा आणि खेळाडू व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा अति उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र खोडवे अध्यक्ष कोष्टी समाज बहुउद्देशीय संस्था यवतमाळ, प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय कोष्टी परिषदेचे महासचिव नारायणराव वड्डे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रमोद गारोडे परतवाडा, विलासराव भड अखिल भारतीय कोष्टी परिषद उपाध्यक्ष कार्यक्षेत्र विदर्भ व नागेश रातोळे अखिल भारतीय कोष्टी समाज यवतमाळ जिल्हा संघटक कोष्टी समाज धानकी शहराध्यक्ष तथा भाजप धानकी शहर उपाध्यक्ष त्याचबरोबर मंचावर शैलेश आलोने अखिल भारतीय कोष्टी समाज प्रसिद्धी प्रमुख सुषमा खोडवे, वर्षा खोडवे आदींची उपस्थिती होती. यावेळी तीनही वर्षात उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शील्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अनिकेत राजेंद्र अलोने यांच्या प्रीत्यर्थ शिल्ड आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून गुणवंत विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते


 • महाराष्ट्र विधिसेवा मेळाव्यात आरोग्य विभागाने नोंदविला सहभाग नवे संकल्प

  सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग


  : राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र विधिसेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधिसेवा प्राधिकरण बीड, जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या वतीने पॅन इंडिया लीगल अवेअरनेस अँड आऊट्रीच कॅम्प अंतर्गत महा विधिसेवा मेळावा शिरूर कासार येथे रविवारी पार पडला. यात आरोग्य विभागानेही आपला सहभाग नोंदविला.


 • बालक दिनी जिल्हाधिकारी यांचा बालकांशी संवाद* *परिस्थितिवर मात करण्यासाठी खुप अभ्यास करण्याचे केले आवाहन* अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  बालकांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत सुटू नये असे धोरण शसनाने स्वीकारले आहे.त्यामुळे शासनाने तुमचे शिक्षण पूर्ण करण्याची तजविज केली आहे. शिक्षणामुळे स्व:विकासाचे दरवाजे उघडतात. तुमच्या वाट्याला आलेल्या कठिण परिस्थितिवर मात करण्यासाठी शिक्षण हाच पर्याय आहे. भरपुर अभ्यास करा आणि उच्च पदावर पोहचा असे आशिर्वादरुपी मार्गदर्शन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज बालकांशी संवाद साधतांना केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोविडमुळे आई, वडिल गमावलेल्या तसेच बालगृहातिल बालकांशी संवाद साधुन जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंग दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी ज्योती कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर, सरकारी कामगार अधिकारी प्र. रा. महाले, बालकल्याण समितिचे अध्यक्ष वासुदेव डायरे,श्रीमती आदे, वनिता शिरफुले, प्राची निलावत,काजल कावरे, बालगृहाचे अधिक्षक गजानन जुमळे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी मुलांशी संवाद साधतांना अभ्यास कसा करता, बालगृहात काही अडचणी, समस्या आहेत का? बालगृहात जेवण कसे दिले जाते, कोणत्या शाळेत जाता?, बालगृहापासुन शाळेचे अंतर किती? शाळेत कसे जाता? शिक्षक कोण आहेत या बाबींची माहिती जाणुन घेतली. १४ ते २० नोव्हेंबर या कालावधित बालकामगार मुक्तिसाठी जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. कोणत्याही आस्थपनामध्ये बालकामगार ठेवणार नाही अशी शपथ सर्वांनी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी बालकांना शालेय वस्तुंची भेटही देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती कडू यांनी केले, तर देवेंद्र राजुरकर यांनी संचालन केले.


 • कोरोना पार्श्वभुमीवर प्रयोगात्मक क्षेत्रातील कलावंताना अर्थसहाय्यासाठी मुदत वाढ २२ नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावा* अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  कोविड-19 पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबुन असलेल्या कलाकारांना अर्थसहाय करण्याचा निर्णय शासनाचे घेतला होता. सदर योजनेला 31 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. प्रयोगात्मक एकल कलावंतानी 22 नोव्हेंबरपर्यंत अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबधीत तहसिलदार कार्यालयात सादर करावा. सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य एकरकमी एकदाच पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सदर योजनेकरीता एकल कलांकाराकरीता पात्रता निकष व अटी अशा आहेत. महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्म्क कलेतील केवळ कलेवर गुजराण असलेले आर्थिकदृष्टया दुर्बल कलाकार, महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तव्य, कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत,वार्षीक उत्पन्न रुपये 50 हजारच्या कमाल मर्यादेत, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेतुन मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. तसेच यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेले कलावंत या योजनेचा दुबार लाभ घेवु शकत नाही.सदर योजनेचा अर्ज दिनांक 22 नोव्हेंबर2022 चे आत संबधीत तहसिल कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह सादर करावा, सदर योजनेचा शासन निर्णय, अर्जाचा नमुना व आवश्यक माहिती संबधित तहसील कार्यालय, पंचातय समिती, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, यवतमाळ व महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in यावर तसेच http://www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


 • जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बालदिनी बालक दत्तक प्रक्रिया पूर्ण नवे संकल्प

  जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर


  महिला व बाल विकास अधिसूचना 2022 नुसार दत्तक इच्छुक पालकांनी www.cara.nic.com या संकेतस्थळावर देशांतर्गत, देशाबाहेरील, नात्यांतर्गत त्याचबरोबर देशांतर्गत व देशाबाहेरील नात्यांमधील बालकास दत्तक घेण्याबाबत नोंदणी करावी. नोंदणी न करता घेतलेले दत्तक बालक हे अवैध दत्तक प्रक्रिया ठरविली जाईल. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व दत्तक नियमावली 2017 नुसार शिक्षेस पात्र ठरतील, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांन्वये जिल्ह्यातील जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित शिशुगृह, कोल्हापूर येथील बालिकेचे बाल दिना दिवशी जिल्ह्यातील बाळ दत्तक देण्याचा पहिला आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सुनावणीनंतर पारित करण्यात आला. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व दत्तक नियमावली 2017 नुसार दत्तक ग्रहणांसबंधी आंतरदेशीय व देशांतर्गत सर्व प्रक्रिया जिल्हा न्यायालयात पार पाडण्यात येत होती. पण महिला व बाल विकास अधिसूचना दि. 23 सप्टेंबर 2022 नुसार आंतरदेशीय व देशांतर्गत दत्तक विधानाचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहेत.महिला व बाल विकास अधिसूचना 2022 नुसार दत्तक इच्छुक पालकांनी CARA (कारा) www.cara.nic.com या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करुन दत्तक ग्रहणासंबंधी ऑनलाईन पध्दतीने पालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये दत्तकमुक्त झालेले बालक दाखविण्यात येते त्यानंतर पालक, संस्था अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांची दत्तक समितीची बैठक घेण्यात येते. यावेळी पालकांची सर्व कागदपत्रे तपासणी करण्यात येतात व दत्तक इच्छुक पालकांनी बालकासंबंधी पसंती दर्शविल्यानंतर संबंधित संस्था ही जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना दत्तक प्रकरणाची पुढील कार्यवाही करण्याबाबत अर्ज सादर करते. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष हे पालकांच्या कागदपत्रांची छाननी करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सुनावणीसाठी सादर करते. सुनावणीनंतर जिल्हाधिकारी हे दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्याबाबत आदेश पारित करतात. अशा पध्दतीने दत्तक प्रक्रिया पूर्ण केली जाते. दत्तक प्रक्रियेचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्याचा निर्णय चांगला आहे. त्यातून ही प्रक्रिया अधिक गतीने होवू शकते. दत्तक इच्छुक पालक हे www.cara.nic.com या पोर्टलवर नोंदणी करुन बालक दत्तक घेवू शकतात, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली. दि. 14 ते 21 नोव्हेंबर या दत्तक सप्ताहामध्ये जिल्ह्यामध्ये दत्तक विधान प्रक्रियेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर व इतर प्रसुती रुग्णालयामध्ये दत्तक विधान प्रकियेची जनजागृती करण्यात येत आहे


 • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त अंतर्गत जागतिक मधुमेह दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन नवे संकल्प

  सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग


  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान अंतर्गत जागतिक मधुमेह दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन, सुमारे १५४ कर्मचाऱ्यांनी केली तपासणी


 • मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव दिनाच्या निमित्ताने नागरिकांचे सक्षमिकरण आणि आरोग्य शिबीर नवे संकल्प

  सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग


  दिनांक 13/11/2022 रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव दिनाच्या निमित्ताने नांदेड येथील पिपल्स कॉलेज मध्ये कायदेविषयक जन जागृती व कायदे विषयक बाबीची पोहच या द्वारे नागरिकांचेसक्षमिकरण* साठी आणि आरोग्य शिबीर* आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे स्टॉल ला मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉभोसीकर सर, मा. डॉ* . बोराडे मॅडम यांनी भेट देऊन पाहणी पाहणी केली सोबत डॉ. मुरमुरे.डॉ. जाधव उपस्थीत होते.


 • प्रधानमंत्री जीवन ज्योती व सुरक्षा विमा योजनेचे यश नवे संकल्प

  जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर


  पंतप्रधान विमा योजनेचे यश व्यापारी बँकांच्या माध्यमातून प्रधानमंत्री जीवन ज्योती व सुरक्षा विमा योजनेतून जिल्हयात ४५१ मयत वारसांना ९ कोटीवर भरपाइ मिळाली आहे.


 • जिल्ह्यातील बारा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा स्वातंत्रोत्तर फलनिष्पत्ती

  जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर


  जिल्ह्यातील बारा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा दिल्याचा शासन निर्णय ग्राम विकास विभागाच्या वतीने उपसचिव का.गो.वळवी यांनी नुकताच निर्गमित केला आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याकरिता राज्य निकष समितीची दि. 4 नोव्हेंबर रोजी बैठक घेण्यात आली होती. या समितीच्या निकषाप्रमाणे कागदपत्रांची तपासणी करुन खालील तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग देण्यात आला आहे. 1) श्री गजानन महाराज मंदिर, खोतवाडी, ता. हातकणंगले, कोल्हापूर 2) ग्रामदैवत श्री संतुबाई देवालय, हेरवाड, ता. शिरोळ, कोल्हापूर 3) श्री जुगाईदेवी मंदिर, येळवण जुगाई, ता. शाहूवाडी, कोल्हापूर 4) श्री क्षेत्र अंबाबाई देवालय, राधानगरी, ता. राधानगरी, कोल्हापूर 5) श्री पार्वती मंदिर, वडणगे, ता. करवीर, कोल्हापूर 6) श्री विशाळगड तीर्थक्षेत्र, गजापूर - विशाळगड, ता. शाहूवाडी, कोल्हापूर 7) सद्गुरु बाळूमामा सत्यवादेवी मंदिर, गुळक्षेत्रे मेतगे, ता. कागल, कोल्हापूर 8) श्री गुडाळेश्वर मंदिर, गुडाळ, ता. राधानगरी, कोल्हापूर 9) श्री स्वामी समर्थ देवालय, बारडवाडी-जोगेवाडी, ता. राधानगरी, कोल्हापूर 10)श्री नृसिंह सरस्वती मंदिर, निगवे (खालसा), ता. करवीर, कोल्हापूर 11) महादेव मंदिर, बालिंगे, ता. करवीर, कोल्हापूर 12) श्री दत्त मंदिर, शेणगाव, ता. भुदरगड, कोल्हापूर


 • राज्यात ३८ हजार २१५ महिला कर्करोग संशयित असल्याचे निष्पन्न आरोग्य विभागातर्फे तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार करण्याचे नियोजन नवे संकल्प

  सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग


  सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या अभियानांतर्गत ९ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील ३ कोटींहून अधिक महिला व मुलींची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ३८ हजारांवर महिला कर्करोग संशयित असल्याचे समोर आले असून, त्यांच्यावरील उपचारांचे नियोजन यापुढील टप्प्यात करण्यात येणार आहे.


 • जनावरांची काळजी व सुश्रुषा यावर ८० टक्के भर देऊन जनावरांना बरे करावे *- पशु संवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंग *बाभुळगाव,नेर, दारव्हा तालुक्यात केली जनावरांची पाहणी अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  महाराष्ट्रामध्ये लंपी चर्मरोग हा साथरोग हाताळणे हे पशुसंवर्धन विभागासमोर मोठे आव्हान होते. मात्र पशुसंवर्धन विभागाने हे आव्हान चांगल्या पद्धतीने हाताळले. यापुढेही दोन महिने हे आव्हान हाताळण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी आणि डॉक्टरांनी जनावरांची काळजी व सुश्रुषा ८० टक्के आणि २० टक्के मेडिसिन यावर भर देऊन जास्तित जास्त जानावरांना या आजारातुन बरे करावे अशा सूचना पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंग यांनी केले. लंपी चर्मरोग प्रादुर्भाव बाबत आज श्री सिंग यांनी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय महसूल भवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विद्यापीठाचे सहाय्यक अधिष्ठाता अनिल भिकाने, पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर क्रांती काटोले उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकारी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी दूरदृष्य प्रणाली द्वारे सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री सिंग यांनी पशुधन विकास अधिकारी यांनी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे सांगून सकाळी नऊ ते रात्री नऊ या बारा तासाच्या कालावधीत एकदा तरी गंभीर असलेल्या जनावरांची पाहणी करावी. तसेच आवश्यक असलेले उपचार करताना पशुपालकांना काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करावे. मध्यम आणि गंभीर रुग्णाच्या परिस्थितीत तपासणी,लक्षणे आणि उपचाराचे केस पेपर सांभाळुन ठेवावेत. जास्त प्रमाणात औषधीचे डोस देऊ नये. कमी औषधे आणि जास्त सुश्रुषा व काळजी यानेच जनावरे बरी होतील. विदर्भात पशुपालक जनावरांची काळजी पोटच्या मुलाप्रमाणे घेतात त्यांमुळे येथे मर्तुकिचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास येते असेही त्यांनी यावेळी सांगितले. साथ रोगात मनुष्यबळ सर्वात महत्त्वाची गोष्ट असून शासनाने यासाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ घेण्यासाठी मान्यता दिल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लंपी साथरोग हाताळण्यासाठी आता मनुष्यबळ उपलब्ध झालेले आहे. त्याचबरोबर शासनाने औषधे आणि इतर आवश्यक असलेले साधने खरेदी करण्यासाठी सुद्धा मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पशुपालकांना त्यांच्या जनावरांचा उपचार करतांना आर्थिक बोझा पडणार नाही याची काळजी घेतलेली आहे. यावेळी डॉक्टर अनिल भिकाने यांनी मार्गदर्शन करताना वासरांना आणि गर्भार जनावरांना लसीकरण पूर्ण करण्यासंदर्भात माहिती दिली. लसीकरणानंतर सुद्धा लंपी साथ रोगाच्या रुग्ण आढळत आहेत. पण हे रुग्ण सौम्य ते मध्यम या प्रकारात आढळून येत आहेत. या रुग्णांमध्ये मरतुकी होण्याचे प्रमाण कमी असून हे रुग्ण उपचाराला लवकर प्रतिसाद देऊन बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लसिकरण आणि उपचार प्रोटोकॉल व्यवस्थितपणे पाळावा असे श्री भिकाणे यांनी यावेळी सांगितले. सकाळी आयुक्तांनी बाभुळगाव तालुक्यातील नांदोरा, नायगाव, राणी अमरावती, नेर तालुक्यातील आजंती आणि दारव्हा मधिल तरनोळी या गावातिल गंभीर आणि मध्यम रुग्णांची पाहणी करुन पशुपालकांना औषधे, उपचार आणि लसिकरणाबाबत माहिती जाणुन घेतली तसेच शेतक-यांना मार्गदर्शनही केले. यावेळी गट विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.


 • अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा दौरा अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री संजय राठोड हे 11 नोव्हेंबर 2022 रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.15 वाजता यवतमाळ येथून शासकीय वाहनाने महागाव ता. दिग्रस कडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती तसेच माँ आरोग्य सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत मोफत नेत्र तपासणी आरोग्य शिबीर कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता विश्रामगृह वन विभाग सिंगद ता. दिग्रस कडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता विश्रामगृह वन विभाग सिंगद येथे आगमन. दिग्रस तालुक्यतील सर्व कार्यालयीन विभाग प्रमुख यांचेसोबत गाव विकास व गावपातळीवरील विविध प्रश्नासंदर्भात बैठक घेतील. सायंकाळी 6.30 वाजता शासकीय विश्रामगृह दिग्रस कडे प्रयाण. सायंकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह दिग्रस येथे आगमन व तेथील उपस्थित पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व अभ्यागतांच्या भेटी. सोईनुसार निवासस्थान यवतमाळ कडे प्रयाण.


 • मतदार जागृतिसाठी निघाली सायकल रॅली अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांनी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. पण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत आपले नाव नोंदवणे आणि मतदार यादीत नाव आहे की नाही याची तपासणी करण्याचे कर्तव्य नागरिकांनी पार पाडून देशाचे भाग्यविधाते व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले अमृत महोत्सावानिमित्त १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीकरीता आज सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी समता मैदान येथुन रॅलीला मार्गस्थ केले. ही रॅली समता मैदान येथुन पुनम चौक, मेनलाईन, तहसिल चौक, आर्णी रोड, आर्णी नाका, संविधान चौक, जिल्हाधिकारी कार्यालया समोरुन समता मैदान येथे समाप्त झाली. या सायकल रॅलीच्या समारोप प्रसंगी त्यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी निवडणूक स्नेहल कनिचे उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे उपस्थित होते. रॅलीत महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले,सक्षम लोकशाहिची पहिली पायरी ही मतदार नोंदणी आहे. २०२३ च्या जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ओक्टोबर महिन्याच्या १ तारखेला १८ वर्ष पूर्ण होणार असलेल्या किंवा १८ वर्ष पुर्ण झालेल्या नागरिकांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर पर्यंत मतदार यादित नाव नोंदविता येते. नमुना ६ भरुन मतदार नाव नोंदणी करु शकतात. महाविद्यालयिन विद्यार्थ्यानी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करावी. मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक संलग्न करणे, मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, मतदार यादीतील दुरुस्ती करणे तसेच स्थलांतरीत/मयत मतदारांचे नाव वगळणे हे काम या दरम्यान होणार असुन सर्वानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. आज एकिकृत मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या मतदार यादीवर ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर यादरम्यान नागरिकांना दावे व हरकती घेता येऊ शकतात. उद्या १० नोव्हेंबर रोजी मतदार यादीचे वाचन करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार नोंदणीसाठी १९,२० नोव्हेंबर आणि ३, ४ डिसेंबर या दिवशी विशेष शिबिर आयोजित करण्यात येत आहे. तसेच दिव्यांग, विद्यार्थी आणि महिला यांच्यासाठी १२ व १३ नोव्हेंबर, तृतीयपंथी, देह व्यवसायात असलेल्या महिला, घर नसलेल्या विमुक्त व भटक्या जमातीतील व्यक्ती यांच्यासाठी २६,२७ नोव्हेंबर रोजी विशेष शिबीर असणार आहे. दावे आणि हरकती २६ डिसेंबर पर्यंत निकाली काढण्यात येतील. त्यानंतर अंतिम मतदार यादी पाच जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.


 • सर्वांनी कर्तव्य पार पाडले तर हक्क आपोआप मिळतील* एस.व्ही. हांडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे प्रतिपादन* अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  आर्थिक परिस्थीतीमुळे कुणीही न्यायापासुन वंचित राहू नये. जे न्यायालयामध्ये पोहचु शकत नाही त्यांच्यापर्यंत मोफत विधी सेवेची माहिती पोहचवा. शासकिय सेवेत सर्वांनी आपले कर्तव्य पार पाडले तर हक्क आपोआप मिळतात,असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांनी केले. राष्टीय विधी सेवा दिनानिमित्य विधी साक्षरते बाबत जनजागृती करण्यासाठी आज सकाळी राली काढण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयाचे सभागृहामध्ये आयोजित शिबीरात न्यायमुर्ती श्री हांडे बोलत होते. यावेळी डॉ. जी.पी. कवडीकर, जिल्हा न्यायाधीश-1, यवतमाळ, ए.ए. लऊळकर, जिल्हा न्यायाधीश-2, यवतमाळ तसेच अमित बदनोरे, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के.ए. नहार उपस्थीत होते. राष्टीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट् राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशावरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांचे मार्गदर्शनाखाली 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत पॅन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत गावोगावी दुर्गमभागात जावून जनसामान्यांना मोफत कायदेविषयक माहितीचा प्रचार व प्रसार पॅरा विधी स्वंयसेवकांमार्फत करण्यात येत आहे. 1995 पासुन 9 नोव्हेंबर हा राष्टीय विधी सेवा दिन साजरा करतात. संविधानाने दिलेले अधिकार आणि कायद्याबाबत जेव्हा सर्वांना माहिती होईल तेव्हा या दिनाचे फलित होईल असे श्री हांडे यांनी यावेळी सांगितले. सदर कार्यक्रमामध्ये जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अमित बदनोरे यांनी विधी सेवेमार्फत ज्या काही कायदेशिर सेवा आहेत ते सामान्य नागरीकांपर्यत पोहचविणे हा या मागचा उद्येश असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 डाॅ. जी.पी. कवडीकर, जिल्हा न्यायाधीश-2 ए.ए. लउळकर यांनीही समयोचित भाषण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन 5 वे सह दिवाणी न्यायाधीष क.स्तर एस.एस. मतकर, यांनी तर आभारप्रदर्शन के.ए. नहार यांनी केले. यावेळी यवतमाळ न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील मंडळी, कर्मचारी वर्ग, अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, महात्मा जोतीराव समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, पॅरा विधी स्वंयसेवक मोठया संख्येने उपस्थीत होते.


 • दिव्यांगांनी दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे जिल्हाधिकारी अंमलबजावणी

  जिल्हा परिषद यवतमाळ


  यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्र नसलेल्या दिव्यांगांसाठी 9 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2022 (जागतीक दिव्यांग दिनापर्यंत)या कालावधीमध्ये दिव्यांग व्यक्तीचा शोध घेवून दिव्यांग व्यक्तींची वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय यवतमाळ येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तपासणी करून ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून दिणेकारिता मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. यवतमाळ जिल्हयातील एकुण 1335 दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केलेले नाही. दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन नोंदणी केलेली असून तपासणी केली नाही अशा दिव्यांगांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामिण भागातील दिव्यांग व्यक्ती करिता संबधीत ग्रामसेवकामार्फत व शहरी भागातील दिव्यांग व्यक्ती करिता मुख्याधिकारी,नगरपरिषद मार्फत शोध घेऊन दिव्यांग व्यक्तींची विशेष मोहिमेतंर्गत तपासणी करून ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेत.


 • सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार उद्घाटन नवे संकल्प

  सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग


  कोरोना महामारी नंतर आरोग्य जपण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. राज्य शासनाने देखील माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान सुरू करून राज्यातील महिलांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. तर परंडा येथे कोरोना महामारीच्या संकटानंतर राज्यातील पहिले महाआरोग्य शिबीर दिनांक २६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.


 • साताऱ्यात 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाला यश, १० लाख महिलांची तपासणी... नवे संकल्प

  सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग


  राज्य शासनाने 'माता सुरक्षित, तर घर सुरक्षित' अभियान सुरू केले असून, सातारा जिल्ह्यात याला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९ लाख ८१ हजार महिला आणि मुलींची मोफत तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये आजार निदर्शनास आल्यास उपचारही करण्यात येत आहेत.


 • काय आहे 'आभा' हेल्थ कार्ड? आतापर्यंत ९ लाख जणांनी केली नोंदणी; वाचा सविस्तर.. नवे संकल्प

  सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग


  केंद्र शासनाने आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट (आभा) अर्थात डिजिटल हेल्थ कार्ड लाँच केले आहे. या अंतर्गत आता डॉक्टरकडे उपचारासाठी जाताना जुने रिपोर्ट घेऊन जाण्याची गरज नाही. कार्ड दाखवताच सर्व कुंडली एका क्लिकवर दिसणार आहे. प्रत्येकाने मोबाईलवर कार्ड काढून घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे रेकॉर्ड आॅनलाईन झाल्याने फायदा होणार आहे. तर कार्ड काढण्यात सातारा राज्यात आघाडीवर आहे.


 • 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियान : ५२ टक्के मोफत आरोग्य तपासण्या पूर्ण नावीन्यपूर्ण कल्पना

  सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग


  : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात 'माता सुरक्षित, तर घर सुरक्षित' अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातही या अभियानांतर्गत १८ वर्षांवरील महिला व मुलींची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ५२ टक्के महिला व मुलींची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ४८ टक्क्यांसाठी प्रशासन प्रयत्नरत आहे.


1 2