सुचना व माहिती

एकता दौड आयोजन    31 October 2022

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7 ते 8 या वेळात राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात किमान शंभर ठिकाणी एकता दौड आयोजित करून सदर कार्यक्रमाद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात यावा. त्यासाठी शाळा महाविद्यालये मधील विद्यार्थ्यांसह सर्व वर्गातील जनतेने सहभागी होऊन सदर कार्यक्रम यशस्वी करावा.

नगरपरिषदामध्ये बचत गटांनी शासकीय कार्यालयात झेंडे वितरित/ विक्री साठी स्टॉल उभारनी    25 July 2022

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा मोहिमेची नांदेड जिल्ह्यातील सर्व 16 नगरपरिषद मध्ये अंमलबजावणी करण्यात येत असून त्या अंतर्गत काही नगरपरिषदामध्ये बचत गटांनी शासकीय कार्यालयात झेंडे वितरित/ विक्री साठी स्टॉल उभारले असून या आठवड्यात सर्व नगरपरिषदामध्ये हे स्टॉल कार्यान्वित होतील.

डिजिटल राखी रिपोझिटरी    24 July 2022

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, दिनांक १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान, देशात "हर घर तिरंगा" अर्थात "घरोघरी तिरंगा" हे अभियान संपन्न होत आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाने दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या दरम्यान "स्वराज्य महोत्सवाचे" राज्यात सर्वत्र आयोजन करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. या स्वराज्य महोत्सवा दरम्यानची एक महत्त्वाची तारीख म्हणजे ११ ऑगस्ट ही होय! कारण या दिवशी देशात व राज्यात रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. देशाच्या सीमेवर तैनात असणारे आपले सैनिक, डोळ्यात तेल घालून आपले संरक्षण करत असतात. या सैनिकांना ११ ऑगस्ट अर्थात रक्षाबंधन दिवशी तिरंगा डिजिटल राख्या भेट देणे प्रस्तावित आहे. ही भेट आपल्याला डिजिटल स्वरूपात देता येऊ शकते. राज्यातील महिला, "डिजिटल तिरंगा राखी" शासनाच्या संकेतस्थळावर पाठवू शकतात. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने यासाठी mahaamrut.org या संकेतस्थळावर ही सुविधा दिलेली आहे. संकेतस्थळाच्या पहिल्या पानावरच "डिजिटल राखी" यावर क्लिक केल्यानंतर, एक फॉर्म भरून डिजिटल तिरंगा राखी पाठवता येईल. यासाठी राखी पाठवणाऱ्याचे नाव, मोबाईल नंबर व गावाचे नाव नमूद करणे आवश्यक राहील. राज्यातून प्राप्त झालेल्या या डिजिटल राख्या केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाकडे पाठवण्यात येतील; जेणेकरून आपल्या देशाचे संरक्षण करत असणाऱ्या वीर जवानांना, महाराष्ट्रातील महिला भगिनींनी कडून प्राप्त राख्या अग्रेषित केल्या जातील. या उपक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय करत आहे.
सदर लिंक 1 ऑगस्ट 2022 पासून उपलब्ध करण्यात येईल.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत "स्वराज्य महोत्सव" उपक्रम    30 June 2022

स्वराज्य महोत्सव भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, देशात व राज्यात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दिनांक ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या दरम्यान राज्यात व देशात हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी "स्वराज्य महोत्सव" या संकल्पनेस अनुसरून नुकताच शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.

काय आहे हा स्वराज्य महोत्सव:
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाची चळवळ असणाऱ्या 'चले जाव चळवळीची" सुरुवात मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदान येथे झाली होती. त्यामुळे ९ ऑगस्ट या दिनाचे औचित्य साधून, स्वराज्य महोत्सव राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२३ या दरम्यान राज्य पातळी, जिल्हा पातळी, तालुका पातळी, ग्राम/वार्ड पातळी अशा विविध स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये जनतेचा उत्स्फूर्त सहभाग असावा यासाठी, ग्राम व वार्ड स्तरावर कार्यक्रमांचे वेळापत्रकही निश्चित केलेले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, युवक, शेतकरी, उद्योजक, सेवा पुरवठादार, प्रशासकीय यंत्रणा तसेच समाजातील अन्य सर्व घटकांचा सहभाग असणे अभिप्रेत आहे.

बुजुर्गों की बात देश के साथ, जन उत्सव जन के द्वारा, मेरा गाव मेरी धरोहर, विद्यार्थी विरासत योजना अशा वेगवेगळ्या संकल्पनातून लोक सहभाग वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा" उपक्रम राबविण्याबाबत    20 June 2022

हर घर तिरंगा उपक्रम भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, देशात सर्वत्र "आजादी का अमृत महोत्सव" साजरा करण्यात येत आहे. त्या महोत्सवाचा एक भाग म्हणूनच दिनांक ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या दरम्यान देशात "हर घर तिरंगा" हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग ही अतिशय महत्त्वाचा असून, महाराष्ट्र शासनाने या संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

"हर घर तिरंगा" या उत्सवात राज्यातील सर्व नागरिकांनी सहभाग घेणे अपेक्षित आहे. यासाठी दिनांक ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या दरम्यान, नागरिकांनी आपल्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवावा असे आवाहन करण्यात येत आहे. राष्ट्रध्वज फडकवण्याबाबत ध्वजसंहितेमध्ये सुधारणा केलेली असून, आता कोणताही नागरिक, कोणतीही खाजगी आस्थापना/ कार्यालय आपल्या घरावर अथवा कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवू शकतात. भारतीय राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखून हा उपक्रम सर्वांनी साजरा करावयाचा आहे. यासाठी राष्ट्रध्वजाचे कापड खादी, पॉलिस्टर, स्पन, वुल अशा प्लास्टिक वगळता इतर प्रकारचे कापड ही उपयोगात आणता येऊ शकते. ध्वजसंहितेतील काही गोष्टींचे पालन करून सर्वांनी या उपक्रमात सहभागी होणे अपेक्षित आहे. या उपक्रमास राष्ट्रध्वजाचे पावित्र्य जपून ध्वज व्यवस्थित ठेवावा अशा प्रकारच्या सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत.

यासाठी नागरिकांनी स्वतः ध्वज विकत घ्यावयाचे आहेत. आपल्या गावातील/ वार्डातील ग्रामपंचायत वार्ड /कार्यालय, स्वस्त धान्य दुकाने या ठिकाणी हे ध्वज उपलब्ध होऊ शकतील. कृपया नागरिकांनी आपली नोंदणी तेथे करून या उपक्रमात हीरहिरीने सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

शासकीय पत्रव्यवहारांवर आता "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" चिन्ह, 75 आठवडे, 75 कार्यक्रमांचे आयोजन करणार    2 December 2021

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या, त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत १५ ऑगस्ट २०२२ पर्यंतच्या ७५ आठवड्यांत ७५ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी जास्तीत जास्त माध्यमांचा वापर करण्याचा शासनाचा मानस असून त्या अनुषंगानेच शासकीय पत्रव्यवहार व इतर ठिकाणी या सुनिश्चित चिन्हाचा वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिन्ह    15 September 2021

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या, त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत १५ ऑगस्ट २०२२ पर्यंतच्या ७५ आठवड्यांत ७५ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी जास्तीत जास्त माध्यमांचा वापर करण्याचा शासनाचा मानस असून त्या अनुषंगानेच शासकीय पत्रव्यवहार व इतर ठिकाणी या सुनिश्चित चिन्हाचा वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" साजरा करतांना शासनाने हाती घेतले विविध उपक्रम    27 August 2021

देशाच्या स्वातंत्र लढ्यात अतुलनीय योगदान देणाऱ्या राज्यातल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तसंच त्यांच्या निस्सिम देशभक्तीचा नव्या पिढीला परिचय करुन देण्याच्या उद्देशानं त्यांची निवासस्थानं, स्मृतीस्थळं सुशोभित करणं, त्यांची माहिती प्रसिध्द करणं असे उपक्रम "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" साजरा करतांना शासनानं हाती घेतले आहेत.

या उपक्रमात अंतर्गत हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचं स्वातंत्र्य लढयातलं योगदान लक्षात घेत पुणे जिल्हयातल्या मौजे-खेड इथलं त्यांचं जन्मस्थळ संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा राजगुरु यांच्या जयंतीनिमित्त या स्मारकावर विद्युत रोषणाई तर थोरला वाडा इथं फुलांची सजावट करण्यात आली होती.