4
Sep 22
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आज दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी वृक्षारोपण" करण्यात आले.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बऱ्हाटे सर हे होते. तसेच रा. से. यो. चे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर सर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एन. महिरे सर व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ममताबेन पाटील मॅम हे देखील उपस्थित होते.
आपल्या महाविद्यालयाच्या गार्डन मध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच.बऱ्हाटे सर यांनी बदामाचे वृक्षरोपण केले. तसेच रा. से. यो.चे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर सर यांनी कडूनिंबाचे वृक्षरोपण केले. व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ममताबेन पाटील मॅम यांनी ही कडूनिंबाचे वृक्षरोपण केले.
कार्यक्रमाला रासेयोचे विविध स्वयंसेवक उपस्थित होते. कु. तारकेश्वरी सोनवणे, सागर सोनवणे, आकाश बावस्कर, हर्षल चव्हाण, आदित्य हिवरे, गायत्री बजाज, नेहा पाटील, चेतना पाटील, कांचन पाटील, आश्विनी झोपे, गौरी ढाके, गंगा ढाके, प्रिती चौधरी, हर्षाली कोलते, ममता लक्षवाणी, आदित्य तायडे, अंकुश मगरे, अली शेख, पवन खैरे, गायत्री सनानसे, नयना पाटील इत्यादी. यांसारखे विविध विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.सौ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.व्हि.पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.इ.भंगाळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.