या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमांचे नियोजन करण्यात यावे

- राष्ट्रीय एकात्मता जोपासणाऱ्या संकल्पना व आदर्श
- वसुधैव कुटुंबकम
- एकता आणि शांततामय वातावरण
- नाविन्यपूर्ण शोध
- नवभारत कल्पना
- सर्वांगीण विकास
- चिरंतन विकास
- राष्ट्रीय सुरक्षा
- न्याय

नावीन्यपूर्ण कल्पना या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेले कार्यक्रम

29
Sep 22
शाहू वाचनालय कागल येथे पर्यटन कार्यशाळा

दिनांक 29 रोजी शाहू वाचनालय कागल येथे पर्यटन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेस सचिन शानभाग,कोल्हापूर,कागल येथील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक ,वाहतूक संघटना, रिक्षा चालक संघटना ,नागरिक यांनी उत्साहाने कार्यशाळेत सहभागी झाले. सचिन शानभाग यांनी उत्तम मार्गदर्शन केले.

अधिक माहिती...
29
Sep 22
तहसील कार्यालय गडहिंग्लज येथे पर्यटन कार्यशाळा

दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी तहसील कार्यालय गडहिंग्लज येथे पर्यटन कार्यशाळा मा जिल्हाधिकारी सर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करणेत आली .सदर कार्यशाळेस हॉटेल संघटना अध्यक्ष,हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. सदर कार्यशाळेमध्ये Gadhinglaj तालुक्यातील धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे येथील पर्यटन वाढवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. यावेळी मा लाटकर साहेब Opal हॉटेल कोल्हापूर व वासिम यांनी सर्व व्यावसायिक यांना मार्गदर्शन केले..

अधिक माहिती...
28
Sep 22
लम्पी रोगाबाबत जनजागृती व उपाययोजना अनुषंगाने आढावा बैठक

लम्पी रोगाबाबत जनजागृती व उपाययोजना अनुषंगाने आढावा बैठक- श्री. समर्थ कृपा हॉल बांबवडे ता शाहूवाडी येथे आज दि 28/9/2022 रोजी घेण्यात आला आहे

अधिक माहिती...
28
Sep 22
गडमुडशिंगी येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानास सुरवात

गडमुडशिंगी येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानास सुरवात सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिला किशोरवयीन मुली गरोदर माता यांनी स्वताची काळजी घेऊन आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित राहिल्या तर संपूर्ण घर सुरक्षित होईल असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांनी केले ते गडमुडशिंगी ता.करवीर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मुडशिंगी मार्फत आयोजित केलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्ही.व्ही. यादव गटविकास अधिकारी करवीर व डॉ.फारुख देसाई तालुका वैद्यकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. गटविकास अधिकारी व्ही.व्ही.यादव म्हणाले कि,शासनाच्या आरोग्य विभागामार्फत गरोदर माता व बालकांच्या करिता विविध योजना कार्यन्वित आहेत त्याच्या लाभ घ्यावा तसेच आरोग्य विभागामार्फत गरोदर मतांच्या करिता कराव्या लागणाऱ्या सर्व चाचण्या केल्या जातात. त्या गरोदर मातानी करून घ्यावा म्हणजे पुढील योग्य ते उपचार करता येतात. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फारुख देसाई म्हणाले कि,माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान १८ वर्षा वरील सर्व लाभार्थ्यांच्या करिता असून या मध्ये सर्व आजारांची तपासणी,उपचार व संदर्भीय सेवा देण्यात येणार असून माता मृत्यूंचे प्रमाण कमी करणे हा या अभियानाचा मूळ उद्देश असून तो सफल होण्या करिता सर्वांनी सहभाग व्हावे असे आवाहन केले या कार्यक्रमास डॉ.रिजवाना मुल्ला वैद्यकीय अधिकारी, डॉ.अमित सोहनी, सौ.अश्विनी शिरगावे सरपंच, सौ.राजमाने मा.पं.स.सदस्य, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य, प्रा.आ.केंद्र मुडशिंगी अंतर्गत असणाऱ्या सर्व आशा सेविका, प्रा.आ.केंद्राचे सर्व सदस्य व गावातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागत राजेंद्र व्हटकर आरोग्य सेवक यांनी केले तर आभार संध्या महाजन आरोग्य सेविका यांनी मानले

अधिक माहिती...
28
Sep 22
World Rabies Day,Dept of Community Medicine, Iggmc Nagpur Maharashtra

Department of Community Medicine , Iggmc Nagpur Observed World Rabies Day on 28/09/2022 by presenting a seminar on Rabies to Last year MBBS students. This program was organised under the guidance of Dr Ashok Jadhao Sir, professor and head, dept of Community Medicine.

अधिक माहिती...
27
Sep 22
दि.१५सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या सेवा पंधरवडयामध्ये ग्राम पंचायतस्तरावर विकास आराखडा तयार करून अंमलबजावणी

दि.१५सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या सेवा पंधरवडयामध्ये ग्राम पंचायतस्तरावर परिसर स्वच्छता करावी. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी ग्राम पंचायतीवर भार न देता घरगुती स्तरावर उपाययोजना कराव्यात तसेच प्लास्टीक कचरा व्यवस्थापनासाठी गावस्तरावर जाळीचे पिंजरे ठेवण्यात यावेत आणि प्लास्टीक कच-याचे व्यवस्थापन करावे. यासोबतचं गावाचा शाश्वत विकास साधायचा असेल तर गावाची स्वच्छता आणि पर्यावरण याचा प्राधान्याने विचार करून विकास आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी. तसेच सर्व गावांनी हागणदारी मुक्त अधिक निकष पुर्ण करुन मार्च २०२३ अखेर सर्व गावे हागणदारी मुक्त अधिक घोषित करावीत असे आवाहन कार्यशाळेसाठी उपस्थित सर्व सरपंचांना केले. या कार्यशाळेत युनिसेफचे राज्य स्वच्छता सल्लागार जयंत देशपांडे यांनी हागणदारीमुक्त अधिक गाव संकल्पना, घटक व प्रक्रिया या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन याबाबत ही मार्गदर्शन केले. तसेच जिल्हयामध्ये बायोगॅस प्रकल्पाव्दारे मैला गाळ व्यवस्थापनाचे काम हे अतिशय चांगल्या पध्दतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रियदर्शिनी मोरे यांनी केले. यावेळी अरुण जाधव, अशोक धोंगे, तालुकास्तरावरून सर्व गटविकास अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामपंचायत स्तरावरून सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, ग्रामसेवक, स्वच्छाग्रही, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, जलसुरक्षक असे सुमारे २८४२७ ऑनलाईनव्दारे सहभागी झाले होते.

अधिक माहिती...
27
Sep 22
जागतिक पर्यटन दिन आणि नवरात्रोत्सवानिमित्त महिला पर्यटकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने भेटवस्तूंचे वाटप

जागतिक पर्यटन दिन आणि नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापूरात श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना मंदिर परिसरात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे तसेच पूजा रेखावार उपस्थित होत्या. पर्यटन वृध्दीच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. जागतिक पर्यटन दिना निमित्त महिला पर्यटकांना प्रातिनिधिक स्वरुपात कोल्हापुरी फेटा बांधून स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने देवीचा प्रसाद म्हणून ओटी, अंबाबाईचा फोटो असलेले कॅलेंडर देण्यात आले. कोल्हापूर सराफ संघाकडून कोहापुरी साज, ठुशी तर हॉटेल मालक संघाकडून गूळ, काकवी, चटणी, मसाला अशी शिदोरी आणि जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील गड किल्ल्यांची माहिती देणारी पुस्तके अशा एक हजार वस्तूंची भेट देण्यात आली. कोल्हापूरमध्ये घेण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत यावेळी उपस्थित महिला पर्यटकांनी व्यक्त केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, टाकचे अध्यक्ष बळीराम वराडे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक माहिती...
27
Sep 22
अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा योजनेत कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर -प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत कोल्हापूर जिल्हा कर्ज मंजूरीत राज्यात आघाडीवर

सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन बँकांनी सणांच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित कर्ज प्रकरणे मंजूर करुन नवीन उद्योगांना चालना द्या, असे निर्देश देऊन वार्षिक पतपुरवठा आराखड्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला बँक ऑफ इंडिया कोल्हापूरचे उपविभागीय व्यवस्थापक किरण पाठक, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, नाबार्ड चे आशुतोष जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे आदी उपस्थित होते. अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा योजनेत कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर असून आणखी जोमाने काम करुन या आर्थिक वर्षाचेही उद्दिष्ट साध्य करुन जिल्हा आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी सांगितले. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत गत वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील कोल्हापूर जिल्हा कर्ज मंजूरीत राज्यात आघाडीवर असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्येही याचपद्धतीने वाटचाल करावी, अशा सूचना त्यांनी सर्व बँकाना केल्या. ग्राहकांना केसीसी दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कृषी पायाभूत विकास निधी (AIF), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना(PMFME), पीएमइजीपी, सिएमइजिपी, महामंडळाच्या योजना अशा योजनांचा लाभ देऊन नवनवीन व्यवसाय उभारणीस प्रोत्साहन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी दिल्या. सर्व बँकांचा आढावा घेऊन सर्व योजनांचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी विविध विभागातील अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व सभासद बँका व वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वार्षिक पतपुरवठा आराखडा 2022-23 अंतर्गत जून 2022 अखेर 8708 कोटींचा कर्जपुरवठा झाला असल्याचे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. गोडसे यांनी सांगितले. यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये 1777 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून एमएसएमई क्षेत्राला 2517 कोटीचे वाटप झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात खरीप हंगामात पीक कर्जा अंतर्गत 1438 कोटीचे वाटप झाले असून 94 टक्के उद्दिष्टपूर्तता झाली असल्याचे बैठकीत सांगितले. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रासाठी वाटप झालेल्या बँक निहाय कर्जाची माहिती दिली. यावेळी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक बैठकीस उपस्थित होते.

अधिक माहिती...
27
Sep 22
राज्याचे कृषि आयुक्त धीरजकुमार यवतमाळच्या शेतशिवारात माझा एक दिवस बळीराजासाठी उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांशी चर्चा

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या कार्यक्रमांतर्गत राज्याचे कृषि आयुक्त धीरजकुमार यांनी 24 व 25 सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील रातचांदना या गावाला भेट देऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना मार्गदर्शन केले. कृषि आयुक्त धीरजकुमार यांनी कृषि विभागाच्या महाडीबीटी योजना, पोकरा, गोदाम बाधकाम, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, स्मार्ट, कृषि पायाभूत निधी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना इत्यादी विविध योजनाबाबत शेतकऱ्यांना महिती दिली. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीमधून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. पिक कर्ज, वन्य प्राण्यामुळे पिकांचे होत असलेले नुकसान, पांदन रस्ता, वीज भारनियमन, पिक विमा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पाणी पुरवठा, सामुहिक उपसा सिंचन, नाला खोलीकरण, सोयाबीन बियाणे, स्मशानभूमी रस्ता, अतिवृष्टी नुकसान, सौरऊर्जा पंप, शेतमाल विक्री, विहीर दुरस्ती, पाणी फाउंडेशन निधीचा विनियोग करणे, स्वनिधी उपलब्धतेबाबत, शेतमाल निविष्ठांना जीएसटी लागू न करणेबाबत, खत लिंकिंग, पोल्ट्री फार्म ला अनुदान मिळणेबाबत, आरोग्य विषयक समस्या, सबसिडी वरील हरभरा बियाणे लवकर मिळणे, अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात जमा करणे, कोल्हापुरी बंधार्यास गेट लावणे, जनावरांचा विमा काढणे, शेडनेट व सौरउर्जा पंप एकत्रित अनुदानावर मिळणे इत्यादी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना सुचविण्यात आल्या. कृषि आयुक्त यांनी रातचांदना गावातील प्रगतीशील शेतकरी अरविंद बेंडे, गणेश हेमणे, रेखा धामुने, मंगला बेंडे, शुभम बेंडे व वर्षा नरुले यांचा नाविन्यपूर्ण शेती उपक्रमाबाबत सत्कार करून कौतुक केले. त्यांनी शेतामध्ये पिकावर विविध औषधे फवारताना घ्यावयाच्या काळजी बाबत मार्गदर्शन करून गावातील शेतकऱ्यांना फवारणी सुरक्षा किटचे वाटप केले. तसेच पोकरा योजने अंतर्गत जगन्नाथ महाराज स्वयंसहायता समूह, येवती यांना औजारे बँक बाबत कार्यारंभ आदेश दिला. दुसऱ्या दिवशी कृषी आयुक्त यांनी शिवार फेरी मध्ये शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन शेडनेट हाउस मध्ये भाजीपाला लागवड, टोमॅटो लागवड, कापूस, सोयाबीन पिकाची पाहणी केली व शेतकऱ्यांना कामगंध सापळे, पिवळे चिकट सापळ्याच्या वापराबद्दल मार्गदर्शन केले. शेतीपूरक व्यवसाय करून शेतीचे उत्पन्न वाढविण्याचा त्यांनी संदेश दिला. या प्रसंगी विभागीय कृषी सह संचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषि उपसंचालक तेजस चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी अमोल जोशी, तहसीलदार कुणाल झाल्टे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे, तालुका कृषि अधिकारी राजेंद्र फाळके, तालुका कृषी अधिकारी शुभ्रकांत भगत व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक मोने, पिक विमा जिल्हा प्रतिनिधी रामेश्वर थोटे, समूह सहाय्यक श्री. कोळपे हजर होते. तसेच मौजा रातचांदना येथील सरपंच राजेश वाडेकर, उपसरपंच सुधाकर दोनोडे, पोलीस पाटील, प्रगतीशील शेतकरी व कृषि भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी अरविंद बेंडे हे उपस्थित होते.

अधिक माहिती...
23
Sep 22
नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित अभियान’ 18 वर्षावरील 100 टक्के महिलांची आरोग्य तपासणी व्हावी यासाठी सुक्ष्म नियोजन करा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या सूचना

नवरात्र उत्सवादरम्यान ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या शासनाच्या अभियानांतर्गत जिल्ह्यात 18 वर्षांवरील 100 टक्के महिला, माता, गर्भवती यांची आरोग्य तपासणी करून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले असून जिल्ह्यातील सर्व महिलांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा आरोग्य समितीच्या नियोजन मंडळाची सभा जिल्हाधिकारी अमोले येडगे यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आर.डी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण, जिल्हा माता व बाल संगोपान अधिकारी डॉ.पी.एस.ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. तन्वीर शेख, डॉ. रमा बाजोरिया, महाआयटीचे जिल्हा समन्वयक फिरोज पठाण, विस्तार अधिकारी (शिक्षण) राजू मडावी तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक उपस्थित होते. या अभियानात सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 18 वर्षांवरील महिलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. प्रा‌थमिक आरोग्य केंद्रात दररोज माता व महिलांच्या तपासणीची शिबीरे घेण्यात येतील. उपकेंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत मातांची तपासणी, समुपदेशन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामीण रुग्णालय आणि त्यावरील रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. या कालावधीत मानवविकास कार्यक्रमांतर्गत तज्ज्ञांची शिबिरे देखील आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच पांढरकवडा उपविभागात आदिवासी महिलांची लोकसंख्या जास्त आहे तेथे सर्व महिलांची आरोग्य तपासणी होण्यासाठी विशेष लक्ष देण्याची त्यांनी सांगितले. या अभियानात महिलांच्या वजन, उंची, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण याबाबतच्या चाचण्या घेण्यात येतील. आवश्यक वाटल्यास रक्ताच्या चाचण्या, छातीचे एक्सरे आणि इतर चाचण्या केल्या जाणार आहेत. कर्करोग, रक्तदाब, मधुमेह याबाबत चाचणी घेतली जाईल. माता आणि बालकांच्या नियमित लसीकरणाची तपासणी केली जाणार आहे. पोषण, बीएमआय आटोक्यात ठेवण्याबाबत तसेच, मानसिक आरोग्य, स्तनपान, व्यसनमुक्ती याबाबत समुपदेशन केले जाणार आहे. महिलांच्या आरोग्य तपासणीसोबतच लहान बालकांची आरोग्य तपासणी तसेच त्यांना कोणत्या लस देणे आवश्यक आहे याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. प्रधानमंत्री मातृवंदन योजने अंतर्गत नाव व पत्यात बदल झालेल्या गरोदर मातांची नोंदणी करतांना अडचण येवू नये यासाठी या अभियान कालावधीत त्यांचे आधार कार्ड अद्यावत करण्यासाठी विशेष शिबीर घेण्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सध्या शासनामार्फत सेवा पंधरवाडा अभियान सुरू असून त्याअंतर्गत प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे ओळखपत्र, दिव्यांग ओळखपत्र व प्रमाणपत्र, युनिक आयडी, मातृवंदन योजनेचे प्रमाणपत्र वितरण तसेच कोविड लसिकरण आदि आरोग्य सेवांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यत मोफत उपचार दिल्या जातात, नागरिकांना याचे ओळखपत्र बनविण्यासाठी 30 रुपयांपर्यत येणाऱ्या खर्चात ग्रामपंचायतींनी या अभियान कालावधीत योगदान देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान यशस्‍वी करण्यासाठी आरोग्य सेवेशी संबंधित संघटना, अशासकीय संस्था, शासकीय कार्यालयांची मदत घ्यावी. मोहिमेतील उपक्रमांचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा, यासाठी गावात दवंडी देणे, विविध माध्यमातून जनजागृती करणे, आशा अंगणवाडी व आरोग्य सेविका-सेवकांमार्फत घरोघरी माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. माता बाल संगोपान अधिकारी डॉ. पी.एस.ठोंबरे यांनी अभियानाची माहिती सादर केली. कार्यक्रमाला आरोग्य यंत्रणा व इतर विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते

अधिक माहिती...
22
Sep 22
शौर्य दिन कार्यक्रम आणि माजी सैनिक मेळावा 29 सप्टेंबर रोजी

गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय (Govt.Polytechnic College), धामणगांव रोड, यवतमाळ येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे अध्यक्षतेखाली “शौर्य दिन” कार्यक्रम व माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्यामध्ये युध्दविधवा / वीरमाता यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व माजी सैनिक / कुटुंबियांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, यांनी केले आहे.

अधिक माहिती...
21
Sep 22
तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र देण्याकरिता विशेष मोहिम

तृतीयपंथी व्यक्तींसाठी http://transgrender.dosje.gov.in हे राष्ट्रीय पोर्टल सुरु करण्यात आलेले असुन त्यावर यवतमाळ जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र प्रमाणपत्र प्रदान करण्याकरिता 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींनी ओळखपत्र मिळण्याकरिता आपला स्वघोषित पत्र, आधार कार्ड व पासर्पोट आकाराचा फोटो घेऊन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यवतमाळ येथे हजर राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यवतमाळ यांनी केले आहे.

अधिक माहिती...
20
Sep 22
क्षयरोग मुक्त भारत - अथणी शुगर लिमिटेड कारखाना ठरला पहिला निक्षय मित्र

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंर्तगत २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारताच्या उदिदष्ट्यपूर्तीसाठी राष्ट्रपतींनी ९ सप्टेंबरला प्रधा नमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ केला . या योजनेअंतर्गत संस्था , उद्योगसमुह, व्यक्ती, यांनी आपल्य तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन किमान एक वर्षासाठी दत्तक घेवून सहभाग नोंदवावा , असे आवाहन जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री. राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.कोल्हापुर श्री. संजयसिंह चव्हाण यांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देउन अथणी शुगर लिमिटेड, तांबोळे यांनी भुदरगढ व आजरा तालुक्यातील २१ क्षयरुग्णांना दत्तक घेत जिल्हयातील पहिला निक्षय मित्र होण्याचा मान मिळवला आहे. सांसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये क्षयरोगाचा समावेश प्रमुख १० आजारांमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये व भारतामध्ये क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी कालबद्ध कायर्क्रम तयार केला आहे. मा ना.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पयर्ंत क्षयरोगाचे निराकरण करण्याचे धोरण निश्चित केले आहे. ज्या व्यक्तीचा आहार पोषक नाही अशा व्यक्तींमध्ये क्षयरोगाचे प्रमाण अधिक असते. अशा व्यक्तींना उपचार कालावधीत पोषण आहार मिळाला नाही तर त्यांना उपचार मिळूनही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतातच असे नाही. यामुळे क्षयरुग्णांमध्ये पोषक आहार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे क्षयरुग्णांसाठी फूड बास्केट तयार करण्यात आली आहेत.अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी.कुंभार यांनी दिली आहे. निक्षय मित्र उपक्रम काय आहे ? २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत उदिदष्ट पूर्ण करण्यासाठी या योजनेंर्तगत संस्था , उद्योगसमुह, व्यक्ती,यांनी सामाजिक-मानवता भावनेतून आपल्या तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना सामाजिक, व्यावसायिक, पोषण आहार स्वरुपात मदत देऊन किमान एक वर्षासाठी दत्तक घेवून आपला सहभाग नोंदवायचा आहे. यासारख्या सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून गाव, तालुका , जिल्हा , राज्य आणि देश टीबीमुक्तीच्य दिशने जाणार आहे.

अधिक माहिती...
17
Sep 22
आंतराष्टीय किनारपटटी स्वच्छता अभियांन तालुका गुहागर

दिनांक 17.9.2022 रोजी गुहागर तालुक्यातील गुहागर समुद्र कीनारा सर्व शासकीय/निमशासकीय् कार्यालये,सेवाभावी संस्था, स्वयंसेवी गट, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, एन.सी.सी.कॅडेटस, पत्रकास संघ गुहागर, आरजीपीपीएल कंपनी,‍ माध्यमीक शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक यांचे सहभागाने गुहागर समुद्र किनारपटटी स्वच्छता अभियांन पार पडले

अधिक माहिती...
17
Sep 22
स्वच्छ अमृत महोत्सव (इंडियन स्वच्छता लिग) श्री साई जन्मभूमी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत संपूर्ण देशामध्ये स्वच्छ अमृत महोत्सव (इंडियन स्वच्छता लिग) दिनांक १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे , त्यामध्ये पाथरी शहराने देखील सहभाग नोंदविला आहे ,त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १७ सप्टेंबर २०२२ वार शनिवार रोजी शहरातील प्रसिद्ध श्री साई जन्मभूमी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली, यावेळी ब्रँड अम्बेसीडर श्री जुनेद खान दुराणी, कॅप्टन श्रीमती कोमल सावरे , व नगर परिषद पाथरी सर्व अधिकारी व कर्मचारी, पदाधिकारी, व तरुण वर्गाने सहभाग नोंदविला.

अधिक माहिती...
15
Sep 22
प्रभाग सचिवांची कार्यशाळा दिनांक १३/०९/२०२२ ला पंचायत समिती वर्धा येथे घेण्यात आली व या कार्यशाळेत सचिवांना योजनाबाबत माहिती देण्यात आली.

प्रभाग सचिवांची कार्यशाळा दिनांक १३/०९/२०२२ ला पंचायत समिती वर्धा येथे घेण्यात आली व या कार्यशाळेत सचिवांना योजनाबाबत माहिती देण्यात आली व सलग तीन दिवस हि कार्यशाळा घेण्यात आली.

अधिक माहिती...
15
Sep 22
पंचायत समिती वर्धा १५/०९/२०२२ ला पंचायत समिती वर्धा सरपंच समन्वय सभा

पंचायत समिती वर्धा १५/०९/२०२२ ला पंचायत समिती वर्धा सरपंच समन्वय सभा

अधिक माहिती...
14
Sep 22
प्रभाग सचिवांची कार्यशाळा दिनांक १४/०९/२०२२ ला पंचायत समिती वर्धा

प्रभाग सचिवांची कार्यशाळा दिनांक १३/०९/२०२२ ला पंचायत समिती वर्धा येथे घेण्यात आली व या कार्यशाळेत सचिवांना योजनाबाबत माहिती देण्यात आली व सलग तीन दिवस हि कार्यशाळा घेण्यात आली.

अधिक माहिती...
14
Sep 22
प्रभाग सचिवांची कार्यशाळा दिनांक १३/०९/२०२२ ला पंचायत समिती वर्धा येथे घेण्यात आली

प्रभाग सचिवांची कार्यशाळा दिनांक १३/०९/२०२२ ला पंचायत समिती वर्धा येथे घेण्यात आली व या कार्यशाळेत सचिवांना योजनाबाबत माहिती देण्यात आली.

अधिक माहिती...
14
Sep 22
तरुण- तरुणींनी लघुउद्योग सुरु करुन उद्योग क्षेत्राकडे वळावे -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

◆ उद्योगनिर्मितीसाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल --तरुण- तरुणींनी लघुउद्योग सुरु करुन उद्योग क्षेत्राकडे वळावे. तरुणांनी व्यवसाय सुरु करण्याचे धाडस करुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन नवउद्योजकांना प्रशासनाच्यावतीने कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी व्यक्त केला.उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विशेष संकल्पनेतून जिल्ह्यात विविध बँका, शासकीय विभाग, महामंडळे, नाबार्ड यांच्याद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गेले महिनाभर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचा सांगता समारंभ शाहूवाडी तालुक्यात पंचायत समिती सभागृहात झाला, जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, तरुणांनी नाविन्यपूर्ण विचार करुन व्यवसाय करण्याचे धाडस दाखवावे. पारंपरिक ऊस शेती न करता आधुनिक शेती करावी. रेशीम उद्योगाकडे वळावे. उद्योगाला चालना देण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक तालुक्यातील तरुणाला उद्योगाची संधी निर्माण व्हावी, या उद्देशाने तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासन कमी पडणार नाही, अशी खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिली. सर्व तालुक्यामध्ये जिल्ह्यातील बँका, शासकीय विभाग व महामंडळ यांच्याशी योग्य समन्वय साधून अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सर्व तालुक्यातील मेळाव्यांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी त्यांचे अभिनंदन केले. या मेळाव्यास 1300 हून अधिक तरुण-तरुणी, महिला उद्योजकांसह नवउद्योजक उपस्थित होते. उद्योगधंद्यासाठीचे मार्गदर्शन मेळावे ही लोकांसाठी चांगली संधी असून याचा लाभ घेऊन नागरिकांनी नवनवीन व्यवसाय सुर करावेत. शाहूवाडी तालुकातील नागरिकांनी मागणी असणारी पिके घेऊन जिल्ह्यात तालुक्याचा वेगळा ठसा उमटवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शाहूवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार यांनी केले.शासनाच्या बहुतांशी योजना बँकेद्वारे राबविल्या जातात. बँकांमध्ये परिपूर्ण कागदपत्रांसह कर्ज प्रस्ताव सादर करण्याची ग्राहकांची जबाबदारी असते, असे सांगून बँकाच्या नियमामध्ये बसणारे कोणतेही कर्ज प्रकरण नामंजूर होणार नाही, याची ग्वाही बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक हेमंत खेर यांनी दिली. सीबील स्कोअर कमी असलेल्या ग्राहकांना बँकांच्या नियमाअभावी कर्ज मंजूरी करता येत नाही.शाहूवाडी तालुका हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असून औद्योगिक विकासासाठी येथे एखादे क्लस्टर अथवा एमआयडीसी स्थापन करण्याबाबतही त्यांनी सुचविले.या प्रसंगी बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यासह सर्व शासकीय महामंडळे, कृषी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, आरसेटी, बचत गट आदींचे स्टॉल लावण्यात आले होते. प्रत्येक विभागाच्यावतीने संबंधिताना योग्य माहिती देण्यात आली. यावेळी बँक ऑफ इंडिया शाहूवाडी शाखेद्वारे बचत गटांना 21 लाखाचे व पीएमइजीपी व मुद्रा अंतर्गत 31 लाखांचे कर्ज मंजुरीचे धनादेश वाटप करण्यात आले. भात पिक स्पर्धेत कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त विनोद बेर्डे यांचा यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अधिक माहिती...