या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमांचे नियोजन करण्यात यावे

- ध्येय निश्चिती व लक्षांक
- क्षेत्रनिहाय नविन संकल्प
- शासकीय व अशासकीय संस्थांच्या सहभागातून
- विद्यार्थी, युवक, नवउद्योजक यांचा अंतर्भाव

नवे संकल्प या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेले कार्यक्रम

1
Oct 22
मातोश्री वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य केंद्र वडणगे अंतर्गत उपकेंद्र नागदेवाडी येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिक तपासणी शिबिर

मातोश्री वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य केंद्र वडणगे अंतर्गत उपकेंद्र नागदेवाडी येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिक तपासणी शिबिर घेण्यात आले सदर शिबिराचे उद्घाटन माननीय संजय सिंह चव्हाण सो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच माननीय दीपक घाटे सो जिल्हा समाज कल्याण अधिकारी माननीय डॉक्टर फारुख देसाई सो तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती करवीर माननीय डॉक्टर रोहिणी खलीपे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वडणगे यांचे मार्फत 35 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली यावेळी श्री एन वाय लोहार विस्तार अधिकारी पंचायत समिती करवीर तसेच आरोग्यवर्धिनी उपकेंद्र नागदेवाडी येथील सामुदाय आरोग्य अधिकारी स्नेहा कलुरकर व राहुल पाटील तसेच आरोग्य सहाय्यक श्री बेंडखळे श्री कांबळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीम घाडगे मॅडम पवित्रा जमदाडे श्रीम गावडे आरोग्य सेविका आरोग्य सेवक श्री रवी माने श्री अरुण करलकर श्री राजेंद्र ढेंगे व श्री पठाण तसेच नागदेववाडी येथील सर्व आशा स्वयंसेविका वाहन चालक श्री पाटील तसेच वृद्धाश्रमातील अध्यक्ष सचिव कर्मचारी रुंद यांचे सदर शिबिरास सहकार्य लाभले

अधिक माहिती...
30
Sep 22
जिल्हाधिकारी कार्यालयात तंबाखू विरोधी शपथ

आज दिनांक 30/09/2022 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित साधून आज जिल्हाधिकारी कार्यालयात मा.राहुल रेखावार , जिल्हाधिकारिसो,कोल्हापूर , मा.किशोर पवार, अप्पर जिल्हाधिकारिसो, कोल्हापूर व मा.दत्तात्रय कवितके निवासी उपजिल्हाधिकारी ,कोल्हापूर यांच्या उपस्थितित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षातील सामाजिक कार्यकर्त्या श्रीम.क्रांती शिंदे यांनी उपस्थित सर्वांना तंबाखू विरोधी शपथ दिली. यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातील समुपदेशक श्रीम.चारुशीला कणसे ,DEO श्रीम.प्रियांका लिंगडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.

अधिक माहिती...
29
Sep 22
निर्यातदारांची कार्यशाळा व निर्यात उत्पादनांचे प्रदर्शन

निर्यातदारांची कार्यशाळा व निर्यात उत्पादनांचे प्रदर्शन महाराष्ट् शासनाच्या उद्योग विभाग जिल्हा उद्योग केंद्र व स्मॉल इंडस्ट्जि डेव्हलपमेंट बॅंक ऑफ इंडिया सिडबी यांचे संयुक्त विद्यमाने आज दि.29 सप्टेंबर रोजी निर्यातदारांची कार्यशाळा व निर्यात उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. सदरचे प्रदर्शन दोन दिवस असून उद्या दि.30 सप्टेंबर रोजी शेवटचा दिवस आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.जिल्हाधिकारी श्री.राहूल रेखावार यांच्या हस्ते झाले. कोल्हापूर जिल्हयातून निर्यात वाढावी या उद्देशाने या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मा.जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या भाषणात म्हणाले की, निर्यातदारांनी त्यांच्या निर्यात वाढीसाठी आवश्यक असणा-या बाबींचा कृतीआराखडा तयार करावा व निर्यात प्रचलन समिती द्यावा व त्याव्दारे याचा पाठपुरावा करण्यात येईल असे आवाहन केले. तसेच निर्यातदारांची खरेदीदार आणि विक्रीदार यांच्यात समन्वय साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्याचे जाहीर केले. निर्यातदारांना उज्ज्वल संधी असून त्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. त्यानंतर दिवस भर चाललेच्या कार्यशाळेत राष्ट्ीय स्तरावरील निर्यात सल्लागार श्री.मिहीर शहा यांनी निर्यातदारांना सहज सुलभ निर्यात करता यावी, निर्यातदाराची नोंदणी, उत्पादन निवड, निर्यातीसाठी बाजारपेठ निवडणे, आयातदार ग्राहक कसे शोधावेत याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सल्लागार श्री.केशव ताम्हणकर यांनी विविध विभागात निर्यातीच्या संधी तसेच निर्यातदारांना निर्यातवृध्दीसाठी प्रोत्साहन या विषयावर उपस्थित निर्यातदारांना मार्गदर्शन केले. निर्यातदार स्टॉलधारकांचे मा.जिल्हाधिकारी श्री.राहूल रेखावार यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून बारा उत्पादकाना गौरविण्यात आले. तसेच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी श्री.हर्षद दलाल आणि श्री.संजय पेंडसे यांचा स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्, नाबार्ड, इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सील, निर्यातदार उत्पादक यामध्ये कोल्हापूरी चप्पल, गुळ व पदार्थ, तांदूळ, कपडे, चांदीचे दागिने, अग्निरोधक उपकरणे, मातीच्या कलात्मक वस्तू, महिलांचे दागिणे व गृहउपयोगी वस्तू, इ.चे छोटेखानी प्रदर्शन भरविले आहे. सदरचे प्रदर्शन कमी वेळेत अतिशय नियोजनबध्द करण्यासाठी जिल्हा उद्योगकंेद्राचे महाव्यवस्थापक श्री.सतिश शेळके, व्यवस्थापक मंजूषा चव्हाण, दुर्गा पाटील, प्रसाद काटाळे, सतिश जाधव, सुरेश सरंजामे, प्रशांत चव्हाण, नाबार्डचे श्री.अशुतोष जाधव, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक श्री.गणेश गोडसे, सिडबी बॅंकेचे श्री.व्ही.प्रसाद, सह महाव्यवस्थापक बॅंक ऑफ इंडियाचे श्री.किरण पाठक, निर्यातदार उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते

अधिक माहिती...
29
Sep 22
शिरोळ येथे पर्यटन वृद्धीसाठी आयोजित कार्यशाळा

दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी पंचायत समिती शिरोळ येथे पर्यटन कार्यशाळा मा जिल्हाधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करणेत आली .सदर कार्यशाळेस हॉटेल संघटना अध्यक्ष,दुकानदार संघटना अध्यक्ष,वाहतूक संघटना अध्यक्ष ,पर्यटन संबधित गावाचे सरपंच, डॅा. रामचंद्र चोथे , गाईड तथा अभ्यासक खिद्रापूर मंदिर , दत्त देवस्थान व्यवस्थापन समिती , नृसिंहवाडी, नाविक , ग्रामसेवक , श्री कवितके गट विकास अधिकारी , डॅा. अपर्णा मोरे धुमाळ तहसीलदार शिरोळ , श्री जयदीप मोरे, सदस्य पर्यटन समिती कोल्हापूर व ॲड. प्रसन्न मालेकर , कोल्हापूर व अभिजीत जगदाळे , नृसिंहवाडी हे उपस्थित होते. सदर कार्यशाळेमध्ये शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी व खिद्रापूर ही धार्मिक स्थळे, गणेशवाडी येथील प्राचीन गणेश मंदिर, शिरोळ मधील आमणापूर - भोजनपात्र , संताजी घोरपडे समाधिस्थळ व ऐतिहासिक स्थळे , कुरूंदवाड येथील प्राचीन स्थळे व ट्रेकिग संबधित ठिकाणे,पर्यटन व्यवसाय वाढीसाठी करण्याच्या उपाययोजना, शिरोळ मधील प्रेक्षणीय स्थळे ,खाद्यसंस्कृती,न्याहारी निवास योजना इत्यादी बाबत सविस्तर चर्चा झाली. व त्याप्रमाणे शिरोळचा पर्यटन आराखडा तयार करण्याचे निश्चित करणेत आले.

अधिक माहिती...
29
Sep 22
तहसील कार्यालय भुदरगड येथे पर्यटन कार्यशाळा

दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी तहसील कार्यालय भुदरगड येथे पर्यटन कार्यशाळा मा जिल्हाधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करणेत आली .सदर कार्यशाळेस हॉटेल संघटना अध्यक्ष,दुकानदार संघटना अध्यक्ष,वाहतूक संघटना अध्यक्ष ,पर्यटन संबधित गावाचे सरपंच,श्री प्रमोद पाटील,श्री बसरिया गट विकास अधिकारी श्री भोकरे,तहसीलदार भुदरगड उपस्थित होते. सदर कार्यशाळेमध्ये भुदरगड तालुक्यातील धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे , ट्रेकिग संबधित ठिकाणे,पर्यटन व्यवसाय वाढीसाठी करण्याच्या उपाययोजना,भुदरगड मधील प्रेक्षणीय स्थळे ,खाद्यसंस्कृती,न्याहारी निवास योजना इत्यादी बाबत सविस्तर चर्चा झाली.भुदरगड चा पर्यटन आराखडा तयार करण्याचे निश्चित करणेत आले.

अधिक माहिती...
28
Sep 22
जनावरांचे लम्पी रोगाबाबत मार्गदर्शन बैठक

जनावरांचे लम्पी रोगाबाबत मार्गदर्शन बैठक . उपस्थिती - मान तहसिलदार वरुटे मॅडम ,गटविकास अधिकारी भोकरे सो व सहा . गटविकास अधिकारी गावडे सो .

अधिक माहिती...
28
Sep 22
LSD आढावा बैठक

मा जिल्हाधिकारी साहेब कोल्हापूर यांच्या सूचनांचे अंमलबजावणी करणेसाठी मा तहसीलदार, मा गट विकास अधिकारी यांची हातकणंगले तालुक्यातील सर्व सरपंच, ग्राम विकास अधिकारी/ ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्या समवेत LSD आढावा बैठक घेण्यात आली

अधिक माहिती...
27
Sep 22
नवरात्र उत्सव 2022 निमित्त माता आरोग्य तपासणी शिबिर

नवरात्र उत्सव 2022 निमित्त माता आरोग्य तपासणी शिबिर माता सुरक्षित तर भावी पिढी सुरक्षित - माता आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. या शिबिराद्वारे मातांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

अधिक माहिती...
26
Sep 22
पंचायत समिती सावनेर - सेवा पंधरवाडा दिनांक १७/९/२०२२ ते ०२/१०/२०२२ अंतर्गत स्वच्छता हीच सेवा.

सेवा पंधरवडा अंतर्गत पंचायत समिती सावनेर कार्यालय येथे दिनांक २९/९/२०२२ सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे.

अधिक माहिती...
26
Sep 22
सेवा पंधरवाडा अंतर्गत स्वच्छता हीच सेवा - दिनांक १७/0९/२२ ते ०२/१०/२२ .

सेवा पंधरवडा अंतर्गत पंचायत समिती सावनेर कार्यालय येथे दिनांक २९/९/२०२२ सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे

अधिक माहिती...
26
Sep 22
पंचायत समिती सावनेर - स्वच्छता हीच सेवा.

सेवा पंधरवडा अंतर्गत पंचायत समिती सावनेर कार्यालय येथे दिनांक २९/९/२०२२ सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे

अधिक माहिती...
23
Sep 22
"सेवा पंधरवाडा" निमित्त दिनांक २३/९/२२ रोज शुक्रवार (प्रशासन आपल्या गावी ) आदर्श विद्यालय केळवद येथे शिबिराची केलेली पूर्वतयारी व विविध योजनेचे लाभासह लाभार्थ्यांना घेऊन उपस्थित आहेत .

"सेवा पंधरवाडा" निमित्त पंचायत समिती सावनेर अंतर्गत केळवद या दोन राजस्व मंडळातील विविध विभागाच्या विविध योजनेतील शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार "प्रशासन आपल्या गावी" या कार्यक्रमास अनुसरून रोज शुक्रवारला दिनांक २३/९/२२ रोजी सकाळी ९:३० वाजता वर नमूद आयोजित स्थळी एक दिवसीय शिबिरास सर्व अधिकारी आणि कर्मचारी व लाभ वाटायच्या लाभार्थींसह "आदर्श विद्यालय" ग्रामपंचायत केळवद येथे कार्यक्रम स्थळी उपस्थित होऊन उपक्रम राबविण्यात येत आहे.

अधिक माहिती...
23
Sep 22
"सेवा पंधरवाडा" निमित्त दिनांक २३/९/२२ रोज शुक्रवार (प्रशासन आपल्या गावी ) आदर्श विद्यालय केळवद येथे शिबिराची केलेली पूर्वतयारी व विविध योजनेचे लाभासह लाभार्थ्यांना घेऊन उपस्थित असल्याबाबत.

"सेवा पंधरवाडा" निमित्त पंचायत समिती सावनेर अंतर्गत केळवद या दोन राजस्व मंडळातील विविध विभागाच्या विविध योजनेतील शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार "प्रशासन आपल्या गावी" या कार्यक्रमास अनुसरून रोज शुक्रवारला दिनांक २३/९/२२ रोजी सकाळी ९:३० वाजता वर नमूद आयोजित स्थळी एक दिवसीय शिबिरास सर्व अधिकारी आणि कर्मचारी व लाभ वाटायच्या लाभार्थींसह "आदर्श विद्यालय" ग्रामपंचायत केळवद येथे कार्यक्रम स्थळी उपस्थित होऊन उपक्रम राबविण्यात येत आहे.

अधिक माहिती...
22
Sep 22
पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत भोगावती सहकारी साखर कारखाना मार्फत २० टीबी पेशंट दत्तक

पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत भोगावती सहकारी साखर कारखाना मार्फत २० टीबी पेशंट दत्तक घेण्यात आले आहेत. या पेशंटला सहा महिने पोषण आहार किट देण्यासंदर्भातआमदार पी एन पाटील साहेब व चेअरमन भोगावती साखर कारखाना श्री उदयसिंह पाटील कौलवकर यांच्या हस्ते जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.उषा जी कुंभार यांच्याकडे १ लक्ष रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी कारखान्याचे व्हॉईस चेअरमन श्री किरुळकर कार्यकारी संचालक संजय पाटील, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील, CHO परिते डॉ रणजीत पाटील, आरोग्यसेवक श्री विजय शिंदे जिल्हा क्षयरोग केंद्राचे डॉ.मानसी कदम डॉ. विनायक भोई, विनोद नायडू बाजीराव चौगले, विशाल मिरजकर, धनंजय परीट उपस्थित होते.

अधिक माहिती...
21
Sep 22
मंडाणे गावातील सर्व पशुपालकांना ग्रामपंचायत मंडाणे लम्पी स्किन डिसिज या आजारावरील रोगाचे लसीकरण

मंडाणे गावातील सर्व पशुपालकांना कळविण्यात येते की ग्रामपंचायत मंडाणे यांच्या साैजन्याने सध्या जनावरांवर चालू असलेल्या लम्पी स्किन डिसिज या आजारावरील रोगाचे लसीकरण बुधवार दिनांक 21/09/2022 रोजी सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आलेले आहे. तरी सर्व पशुपालकांना विनंती की सर्वांनी आप आपली जनावरे लसीकरणासाठी घेऊन येणे. सदरची लस ही 100 डोसच्या पॅकिंगची असल्याने व तयार केल्यानंतर फक्त एक तासभर टिकत असल्याने ती सर्वच्या सर्व एक तासाच्या आत संपणे बंधनकारक असल्याने कृपया कुणीही गोठ्यावर लसीकरणासाठी डॉक्टरांना बोलावण्याचा आग्रह न करता लसिकरणाच्या ठिकाणी लसीकरणासाठी जनावरे आणावीत ही विनंती.

अधिक माहिती...
21
Sep 22
आजारावरील रोगाचे लसीकरण

मंडाणे गावातील सर्व पशुपालकांना कळविण्यात येते की ग्रामपंचायत मंडाणे यांच्या साैजन्याने सध्या जनावरांवर चालू असलेल्या लम्पी स्किन डिसिज या आजारावरील रोगाचे लसीकरण बुधवार दिनांक 21/09/2022 रोजी सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आलेले आहे. तरी सर्व पशुपालकांना विनंती की सर्वांनी आप आपली जनावरे लसीकरणासाठी घेऊन येणे. सदरची लस ही 100 डोसच्या पॅकिंगची असल्याने व तयार केल्यानंतर फक्त एक तासभर टिकत असल्याने ती सर्वच्या सर्व एक तासाच्या आत संपणे बंधनकारक असल्याने कृपया कुणीही गोठ्यावर लसीकरणासाठी डॉक्टरांना बोलावण्याचा आग्रह न करता लसिकरणाच्या ठिकाणी लसीकरणासाठी जनावरे आणावीत ही विनंती

अधिक माहिती...
20
Sep 22
मान.जिल्हाधिकारीसो यांच्या हस्ते क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप

मान.जिल्हाधिकारीसो श्री.राहुल रेखावार यांच्या हस्ते क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.

अधिक माहिती...
19
Sep 22
ग्रामपंचायत मंडाणे साफ सफाई करताना काही फोटो

ग्रामपंचायत मंडाणे येथील साफ सफाई करताना काही फोटो

अधिक माहिती...
19
Sep 22
एक मुठ पोषण आहार ग्रा.पं.कार्यालय चांद्शी ता.जि.नाशिक

एक मुठ पोषण आहार ग्रा.पं.कार्यालय चांद्शी ता.जि.नाशिक

अधिक माहिती...
19
Sep 22
ग्रा.पं.कार्या.लय चांद्शी ता.जि.नाशिक येथे स्वच्छता मोहीम .

ग्रा.पं.कार्या.लय चांद्शी ता.जि.नाशिक येथे स्वच्छता मोहीम .राबवण्यात आली.गावात धूर फवारणी करण्यात आली.

अधिक माहिती...